1 min read

गोरबंजारा समाजाचा वापर मतासाठी मात्र राज्यसभेत त्याला स्थान नाही!!

Loading

गोरबंजारा समाजाचा वापर मतासाठी मात्र राज्यसभेत त्याला स्थान नाही!!

भारतात अनेक जाती जमाती आहेत..प्रत्येकाचे वेगळे अस्तित्व टिकून आहे. त्याचप्रमाणे गोरबंजारा समाजाचे देशात फार योगदान आहे. गुरूनानकांच्या 'ग्रंथसाहिब'हया ग्रंथात त्यांच्या संतांची वचने आहेत. मुलनिवाशी असलेले लोक त्यांच्या पशुपालन व शेतीच्या जोरावर टिकून राहिले. बर्याच प्रमाणात व्यापार करणारी ही जमात आढळते. राजस्थानात बाबा रामदेव ह्या देवतेला मानणारी ही जमात आढळते. विविध ठिकाणी जाणारी जमात भटकी म्हटली गेली. अशा जमातीचे लोक भारतात 15 कोटी आहेत. महाराष्ट्र 90 लाख आहेत. अशा गोरबंजारा जमातीचा वापर करून सर्वच पक्ष निवडून येतात परंतू ह्या समाजाला राज्यसभेत उमेदवारी न मिळणे हे खूप खेदाचे आहे. कोणत्याच राज्याने राज्य सभेत गोरबंजारा समाजाला उमेदवारी दिली नाही. गोरबंजारा समाजाच्या एकत्रित करण्याच्या व त्यांचा विकास व्हावा म्हणून नावाला गोदरी येथे अखिल बंजारा समाजाचे अधिवेशन घेतले गेले. शासनाचा कोटयावधी पैसा खर्च दाखविला परंतू त्या समाजाचा उमेदवार कोणत्याच पक्षाला चालत नाही हे सिध्द झाले. राज्य सभेच्या 56पैकी 41 जागा भारतात विविध राज्यात बिनविरोध झाल्या..15 जागेसाठी 27 फेब्रु. ला मतदान आहे. ह्या समाजाचे भारतीय स्वातंत्र्य लढयात देखील योगदान आहे. अशा समाजाला कोणताच पक्ष न्याय देत नसल्याने गोरबंजारा समाजाने ह्या सर्व पक्षाचा तीव्र शब्दात निषेध केलेला आहे. विविध राज्यातून समाजसेवी चळवळीने धिक्कार नोंदवला आहे. समाजातील लोक आपल्या भाषेत व्यक्त होतांना म्हणत आहेत "गोरमाटी वेळ आयीच खोटी आब तरी जागो रे "असा आपल्या समाजाला म्हणत पक्षाचा निषेध करित आहेत.

याडिकार पंजाबराव चव्हाण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *