1 min read

मुंबई चिल्ड्रन्स वेल्फेअर सेंटरच्यावतीने राजा माने यांचा गौरव !

Loading

मुंबई चिल्ड्रन्स वेल्फेअर सेंटरच्यावतीने राजा माने यांचा गौरव !

अभिषेक बच्चन, गोविंदा, मिका सिंग, अरबाज खान, रविना टंडनची उपस्थिती.
मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :- वर्सोवा, यारी रोड मुंबई येथील चिल्ड्रन्स वेल्फेअर सेंटरच्यावतीने डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष आणि फ्री प्रेस जर्नल व दैनिक नवशक्तीचे समूह राजकीय संपादक राजा माने यांचा सीडब्लूसीचे प्रमुख अजय कौल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
तब्बल ४३ वर्षांची परंपरा असलेल्या या संस्थेच्या ४१व्या वार्षिक स्नेहसोहळ्यात सहा हजार विद्यार्थी-पालक, नामांकित तारे आणि हितचिंतकांच्या उपस्थितीत मानपत्र, स्मृतिचिन्ह व शाल-श्रीफळ देवून राजा माने यांच्या पत्रकारितेतील योगदानाचा गौरव करण्यात आला.
यावेळी ख्यातनाम अभिनेते अभिषेक बच्चन, अरबाज खान, गोविंदा, अभिनेत्री रविना टंडन, प्रसिद्ध गायक मिका सिंग, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष संजय भैरे,शाळा उपक्रम प्रमुख प्रशांत काशिद सुरेंद्र खानविलकर, पंडित मोहिते-पाटील, सचिन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *