1 min read

संस्कारक्षम विद्यार्थी हा शिक्षणाचा पाया आहे-डेप्युटी सीईओ अनिकेत पाटील

Loading

संस्कारक्षम विद्यार्थी हा शिक्षणाचा पाया आहेडेप्युटी सीईओ अनिकेत पाटील
शाळा विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे माध्यम असून संस्कारक्षम विद्यार्थी हा शिक्षणाचा पाया असल्याचे मत जळगाव जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील यांनी असोदा येथील सार्वजनिक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोपाप्रसंगी व्यक्त केले ते पुढे म्हणाले विद्यार्थी हा उद्याचा नागरिक असण्यासोबतच देशाचा आधारस्तंभ असून देशाच्या विकासासाठी त्याच्या शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानाचा उपयोग महत्वपूर्ण आहे देश आणि त्याच्या प्रती असणारी निष्ठा ही निश्चितपणे शिक्षणाच्या वाटेने जाणारी आहे आणि त्यासाठी शिक्षक आपल्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देत असतात यासाठी त्यांच्या प्रती कृतज्ञता हा व्यक्तिमत्त्वाचा विनयशील भाग आपल्या जगण्याशी निगडित असल्याचे देखील त्यांनी याप्रसंगी मांडले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल होते त्यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या जीवनामध्ये आई-वडिलांशी प्रामाणिक राहत जगण्याच्या दिशा नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार आपण ठरविल्या पाहिजेत आपल्या ज्ञानाचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी होण्याबरोबर आपल्या कौटुंबिक, राज्य, देश पातळीसाठी सुद्धा होणे गरजेचे असल्याचे देखील त्यांनी याप्रसंगी मांडले. त्यांच्या भविष्यकालीन जीवनाला शुभेच्छा देत पर्यवेक्षक एल.जे. पाटील, उपशिक्षिका शुभांगीनी महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी इयत्ता दहावीच्या प्रतिनिधिक स्वरूपामध्ये मिताली भारुळे, यश सोनवणे, तेजस्विनी ढाके, नयन पाटील, कुंदन वाणी, विकास पवार या विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवी ते नववीचे विद्यार्थी विशाखा योगेश पाटील, भैरव संजय चौधरी, योजना दीपक वाणी, कार्तिक मनोहर नारखेडे, साक्षी किरण चौधरी, पूजा नितेश कापडी यांनी गुलाब पुष्प देऊन निरोप दिला कार्यक्रमाचे प्रास्ताविक एल. जे. भुगवड्या यांनी तर अतिथी परिचय वृषाली चौधरी यांनी करून दिला. सूत्रसंचालन एस. के. राणे राजपूत व आभार के.बी. तायडे यांनी मानले. गायत्री चौधरी, फाल्गुनी कोल्हे, दीक्षा चौधरी, आदिती कोल्हे, मीनाक्षी भारुडे, समीक्षा सोनवणे, कुंदन वाणी, छाया सोनवणे, भाग्यश्री सोनवणे, विशाल गंगावणे विद्यार्थी विद्यार्थिनीनी मनोगते व्यक्त केली. विचार मंचावर ज्येष्ठ शिक्षक डी.जी. महाजन, मंगला नारखेडे, उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

सार्वजनिक विद्यालयात निरोप समारंभ प्रसंगी मार्गदर्शन करताना अनिकेत पाटील विचार मंचावर डॉ. मिलिंद बागुल, एस. के. राणे राजपूत मंगला नारखेडे, एल.जे. पाटील, डी.जी. महाजन, शुभांगीनी महाजन, वृषाली चौधरी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *