1 min read

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि जुनी पेन्शन योजना विषयावर खुलेआम चर्चानागपूर येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन.

Loading

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि जुनी पेन्शन योजना विषयावर खुलेआम चर्चा
नागपूर येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन.

ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी)- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्यस्तरीय अधिवेशन 17 व 18 फेब्रुवारी रोजी नागपूर येथे डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृह सिव्हिल लाइन्स येथे संपन्न होत आहे. अधिवेशन करिता राज्य शासनाने दोन दिवसाची रजा मंजूर केलेली आहे.केंद्रीय परिवहन व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार असून शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष वेनुनाथ कडू यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन संपन्न होत आहे.अधिवेशनात प्रमुख मान्यवर म्हणून राज्य मानद सचिव संदीप जोशी प्रभारी कुलगुरू डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा माजी पदवीधर आमदारअनिल सोले माजी शिक्षक आमदार नागो गाणार, भगवानराव साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे.अधिवेशनात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- 20 20 आणि जुनी पेन्शन योजना व अन्य विषयांवर चर्चासत्र आयोजित केले आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कोकण विभाग अध्यक्ष गुलाबराव पाटील यांनी अधिवेशनात सहभागी होण्याचे आवाहन शिक्षक बंधू भगिनींना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *