1 min read

समाज,भाषा,संस्कृती आणि साहित्य यांचा अनोन्य संबंध आहे : डॉ.वासुदेव वले[ १७ वे बहिणाई सोपानदेव खान्देश मराठी राज्य साहित्य संमेलन उत्साहात संपन्न ]

Loading

समाज,भाषा,संस्कृती आणि साहित्य यांचा अनोन्य संबंध आहे : डॉ.वासुदेव वले
[ १७ वे बहिणाई सोपानदेव खान्देश मराठी राज्य साहित्य संमेलन उत्साहात संपन्न ]

‘ समाज ,भाषा,संस्कृती आणि साहित्य यांचा अनोन्य संबंध आहे.यातूनच आपली संस्कृती टिकून राहते.लहान मोठ्या साहित्य संमेलनातून याचे महत्त्व पटत असते.तसेच संमेलनातून समाजाची मानसिक भूक भागवली जाऊन परिसरातील बोलींची माहितीही मिळत असते.आता लोकांना भाषा शिकवायचे दिवस संपले असून लोकांची भाषा,बोली शिकायचे दिवस आलेत ‘ असे प्रतिपादन संमेलनाचे समारोप अध्यक्ष डॉ.वासुदेव वले यांनी केले.
पवन चॅरिटेबल ट्रस्ट जळगाव व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सतरावे बहिणाबाई सोपानदेव खान्देश मराठी राज्य साहित्य संमेलन रविवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी जळगाव येथील सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन मध्ये उत्साहात संपन्न झाले.त्याप्रसंगी डॉ.वले बोलत होते.व्यासपीठावर संजीवकुमार सोनवणे,कार्याध्यक्ष विजय लुल्हे ,गोविंद देवरे,निंबा बडगुजर मान्यवर उपस्थित होते.पुरस्कारासाठी मुल्यांकित साहित्यकृतींच्या साहित्यिकांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मानार्थी

  • ईश्वर रामदास महाजन,( अमळनेर )
  • चतुर्भुज विनायक शिंदे ( शहादा )
  • प्रशांत पंढरीनाथ गुरव,वडती
  • प्रा.रत्नाकर कोळी,जळगाव
  • योगिता सी.शिंपी,जळगाव
  • धनश्री फालक,जळगाव
  • योगिता राहूल सोळुंके ,जळगाव
  • शिवाजी भास्कर शिंदे ,पाचोरा
  • अशोक सोनू पारधे,जळगाव
    आदर्श समाजसेवक सन्मानार्थी
  • राजकिशोर दुर्गेश तायडे,धुळे
  • मनिषा टिकारामसिंग पाटील,भडगाव
  • विद्या सुधाकर सोनार,जळगाव
  • आनंद सपकाळे,भुसावळ
  • एम.टी.लुले,जळगाव
  • सुरेश सिताराम अहिरे,भुसावळ
  • आर.डि.कोळी सर,जळगाव
  • सदाशिव नारायण सोनवणे,जळगाव

परिसंवाद सत्र तीन मध्ये ‘ मराठी भाषा अभिजाततेपासून दूर का आहे ? ‘ या विषयांतर्गत परिसंवादात प्रा.डॉ.वंदना रवींद्र बडगुजर – नंदवे म्हणाल्या,’ मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला तर महाराष्ट्रीयन लोकांचे रोजगाराचे प्रश्न सुटतील आणि विविध बोलींचे जतन संवर्धन व संशोधनात गती येईल तसेच वाचन संस्कृती वाढीस लागेल.मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून सरकारला अपेक्षित असलेले निकष,भाषेच्या उत्पत्ती काल निश्चितीसाठी अपेक्षित ऐतिहासिक पुरावे व साधनांची माहिती सांगून आजतागायत भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून होत असलेले प्रयत्न अधोरेखित केले.सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पत्रकार कवी तथा कार्याध्यक्ष तुषार वाघुळदे यांनी केले.परीसंवादाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर मार्गदर्शनात म्हणाले की,’ मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी मराठी जनतेने जन आंदोलन करून केंद्र शासनावर दबाव टाकणे नितांत गरजेचे आहे.मराठी भाषा दैनंदिन जीवनात व्यवहाराची भाषा म्हणून स्वीकारली पाहिजे. सुत्रसंचलन व आभार संध्या महाजन यांनी केले.
कथाकथन सत्र चार मध्ये राहुल निकम यांनी ‘ हेडंबा ‘ कथा सादर केली.कथेतून अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या हलाखीचे जीवन,येणारे आसमानी संकट याचे शब्दचित्र रेखाटले.उडिद या कमी कालावधीच्या पिकाची हेडंबा या आधुनिक यंत्राने काढणी करतांना अपघात होऊन सामान्य शेतकऱ्याचा करूण अंत झाल्याने कुटुंबाची झालेली आर्थिक दैना,जीवन जगण्याचा संघर्ष व सामाजिक परिस्थिती दमदारपणे मांडून निकम यांनी प्रेक्षकांना अस्वस्थ केले. कथाकथन सत्राचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक विलास मोरे यांनी ‘ संध्याकाळची गोष्ट ‘ कथा सादर केली.कथेतून वृद्ध बाबाची व्यथा रूपकाच्या माध्यमातून मांडली.कथेचा शेवट अचंबित करणारा आणि करुण रसाने लदबदलेला असल्याने कथेला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.कथा सादरीकरणाचे तंत्र आणि मंत्र याचा वस्तूपाठही नकळत मोरेंनी श्रोत्यांना दिला.वेळेअभावी पाचवे सत्र सर्वानुमते रद्द करण्यात आले.


वाङमयीन पुरस्कारप्राप्त सन्मानार्थी
काव्यलेखन ( बालकविता ) – प्रथम – माया दिलीप धुप्पड, द्वितीय – रविंद्र सोनवणे व गोविंद पाटील
काव्यलेखन ( प्रौढ ) – प्रथम : जयवंत बोदडे व संध्या भोळे
द्वितीय – पुष्पा साळवे व अजय भामरे
तृतीय – इंदिरा जाधव व धनश्री मिस्तरी – पगारे
उत्तेजनार्थ – तुकाराम पाटील
पाळधीकर , प्रा.पुरुषोत्तम पाटील
वैचारिक : चित्रा भारत पगारे
लेवा गणबोली – शीतल पाटील
अहिराणी काव्य – मोहन पाटील
कथालेखन द्वितीय – द्वितीय – दीपक तांबोळी
ललित – प्रा.पुरुषोत्तम पाटील,अध्यात्मिक – रितेश अत्तरदे
लोकसाहित्य अन् कला – देविलाल वाघू बाविस्कर (लासूर )
सामाजिक व कौटुंबिक लोकगीते – शाहिर शिवाजीराव पाटील चरित्र – प्रथम – पीटर ताबीची : चंद्रकांत भंडारी
तृतीय – अनुवाद : प्रा.डॉ.श्रीकांत तारे
पोवाडा :- निंबा पुना बडगुजर
पर्यावरण – श्रीमद् प्रशांत बडगुजर
प्रतिनिधीक पुरस्कार सौजन्यमूर्ती : –
प्रा.डॉ.एल.ए.पाटील,
प्रा.राजेंद्र चिंचोले यांच्यातर्फे अनिल भोळे
चित्रकार राजू बाविस्कर तसेच डॉ.संदिप सूर्यकांत काटे आणि शिक्षणतज्ज्ञ संदिप वाक्चौरे यांच्या तर्फे विजय लुल्हे यांनी प्रतिनिधी म्हणून पुरस्कार स्विकारले.


सहाव्या सत्रात राजेंद्र दिघे यांच्या अध्यक्षतेखाली प्रचंड उत्साहात कवी संमेलन संपन्न झाले.व्यासपीठावर ज्येष्ठ कवी शशिकांत हिंगोणेकर,पौर्णिमा हुंडीवाले,डॉ.वंदना बडगुजर विजय लुल्हे,संध्या महाजन,संध्या भोळे,निंबा बडगुजर ,गोविंद पाटील मान्यवर कवी उपस्थित होते.काव्य संमेलनात प्रकाश पाटील,प्रियंका सोनी,बी.के.चौधरी (पुणे ),सुरेश थोरात,तुषार वाघुळदे ,जयश्री काळवीट,ललिता टोके,प्रा.रत्नाकर कोळी,(धुळे ),पौर्णिमा हुंडीवाले,संध्या महाजन,धनश्री पगारे (नाशिक ),ज्योती राणे,सुनिल निंभोरे ( संभाजी नगर ), शितल पाटील,विजय लुल्हे , इंदिरा जाधव,प्रविण लोहार यांसह एकूण ३७ कवींनी कविता सादर केल्या.कवीसंमेलनाध्यक्ष राजेंद्र दिघे (मालेगाव ) मार्गदर्शनात म्हणाले,’ शेतकरी व कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसह त्यांचे दुःख काव्यातून आले पाहिजे समाजात घडणाऱ्या घटनांवर प्रहार करण्याची ताकद कवितेत असते.’ भोवतालच्या जगातील अन्यायाचे वास्तव मांडण्याचे आवाहन दिघे यांनी नवोदितांना केले.’ माणूस हरवतोय ‘ या कवितेतून माणूस कवितेच्या तंत्रज्ञानात भावनाशून्य होऊन माणुसकीला कसा पारखा झाला याचे विदारक चित्र दिघेंनी मांडले.कवितेच्या ज्वलंत आशयघनतेमुळे रसिकांची प्रचंड दाद मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *