आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 निमित्त आदरणीय तंत्र व्यवस्थापक प्रमोद जाधव यांचा सहपत्निक झाला सन्मान
![]()

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 निमित्त आदरणीय तंत्र व्यवस्थापक प्रमोद जाधव यांचा सन्मान
अमळनेर प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 निमित्त आदरणीय तंत्र व्यवस्थापक श्री प्रमोद जाधव सर यांनी जळगांव जिल्हयात प्रथमत: भुसावळ तालुक्यात नाविण्यपूर्ण असे नागली , भगर , राजगिरा प्रात्यक्षिक यशस्वीरित्या राबवून शेतमाल विक्रीबाबत खरेदीदासोबत हमी भावाने करार करून शेतक-यांना नफा मिळवून दिला. तसेच महिला शेतक-यांसाठी जिल्ह्यांतर्गत व राज्यांतर्गत प्रशिक्षणे घेऊन रोजगार प्राप्तीसाठी प्रोत्साहित केले तसेच शाळेतील विद्यार्थ्यांची मिलेट रॅली व सभा घेऊन तृणधान्याचे आहारातील महत्व याबद्दल प्रचार व प्रसार केला. या त्यांच्या कार्याची दखल कृषि विभागाने घेऊन त्यांना विभागीय कृषि संचालक कार्यालय नाशिक विभाग स्तरावर सपत्नीक प्रशस्ती पत्रक व स्मृती चिन्ह देऊन सन्मान करतांना मा. स्मार्ट प्रकल्प संचालक श्री सुनिल वानखेडे सर सोबत मा विभागीय कृषि संचालक श्री मोहन वाघ सर, मा. जिल्हा कृषि अधिक्षक श्री संभाजी ठाकूर सर, मा. श्री कुरबान तडवी सर व इतर अधिकारी उपस्थित होते.

