जुन्या पेन्शन योजनेसाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करेन- शिक्षक आमदार किशोर दराडे
![]()
जुन्या पेन्शन योजनेसाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करेन- शिक्षक आमदार किशोर दराडे
समता शिक्षक परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न.


शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेमध्ये करणे हा माझा संकल्प होता आणि त्या अनुषंगाने मी यशस्वी पाठपुरावा केलेला आहे. विभागातल्या प्रत्येक शिक्षकाला न्याय देणे हे माझे काम आहे. शिक्षकांचे प्रश्न सुटले पाहिजे.शाळांचे प्रश्न सुटले पाहिजे यासाठी शाळा आणि शिक्षक यांच्यासाठी सतत प्रयत्नशील राहील तसेच जुन्या पेन्शन साठी सातत्याने पूर्ण क्षमतेने प्रयत्न करीत राहील, अशा पद्धतीचे प्रतिपादन आपल्या मनोगतामध्ये शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी केले.
आज संपूर्ण शिक्षण व्यवस्था मोडकळीस काढण्याचा प्रयत्न प्रचलित शासन व्यवस्था करीत असून यामुळे बहुजनांच्या शिक्षणाचे वाटोळे होणार आहे आणि याकरिता बहुजनाने जागरूक राहिले पाहिजे. रस्त्यावरची लढाई लढली पाहिजे, अशा पद्धतीचे प्रतिपादन मॅक्स महाराष्ट्र चॅनलचे करेस्पॉन्डंट किरण सोनवणे यांनी समता शिक्षक परिषदेच्या गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात केले.
सालाबादप्रमाणे महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेमार्फत गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन प.न. शाळा जळगाव येथे करण्यात आले होते. समता शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाट कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते. नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे, डायटचे प्राचार्य डॉक्टर अनिल झोपे, वरिष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर चंद्रकांत साळुंखे, डॉक्टर जगन्नाथ दरंदले, मधुकरराव कदम, शांताराम बडगुजर,गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील, शिक्षक नेते शालिग्राम दादा भिरूड, संभाजी पाटील, डॉक्टर मिलिंद बागुल, नारायण वाघ, टी.टी. सोनवणे, जे.पी. सपकाळे मिलिंद भालेराव, गणेश काकडे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी प्राध्यापक भारत शिरसाठ लिखित ‘भारतीय संविधानाचे अनंत उपकार’ व वर्षा अहिरराव लिखित ‘निबंध शिल्प’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळेस जिल्हा व राज्यभरातून एकूण 38 पुरस्कार संघटनेमार्फत देण्यात आले. डायटचे प्राचार्य डॉक्टर अनिल झोपे यांना महात्मा फुले शिक्षण सेवा पुरस्काराने गौरविण्यात आले. संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी धनराज मोतीराय यांना व मधुकरराव कदम यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रावसाहेब जगताप व रणजीत सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाचे विविध टप्प्यांवरील सूत्रसंचालन विनोद सपकाळे, प्रमोद आठवले, सरिता वासवानी, अश्विनी कोळी, सपना रावलानी, गणेश बच्छाव, मनीषा देशमुख, अजय भामरे, सुधीर महाजन, रंजना कोळी, डॉक्टर प्रदीप सुरवाडकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार वर्षा अहिरराव यांनी मानले. संघटनेचे पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष रणजीत सोनवणे सरचिटणीस सुधीर महाजन संघटनेचे उपक्रम विभागाचे जिल्ह जिल्हाध्यक्ष मनोज नन्नवरे,महिला विभाग जिल्हाध्यक्ष छाया बैसाणे,प्राथमिकचे जिल्हाध्यक्ष शैलेश शिरसाठ, शरद धनगर, साहेबराव बागुल, प्रज्ञा तायडे, सरिता वासवानी, भारती ठाकरे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणावर शिक्षक कार्यक्रमाला उपस्थित होते.


