1 min read

गांधी विचार संस्कार परीक्षेत नाजमीन पठाण हिला सुवर्णपदक

Loading

गांधी विचार संस्कार परीक्षेत नाजमीन पठाण हिला सुवर्णपदक

अमळनेर प्रतिनिधी
गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव आयोजित गांधी विचार संस्कार परीक्षेचा जिल्ह्यातील निकाल नुकताच जाहीर झाला,गांधी विचार संस्कार परीक्षेत कै. नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयातील कु. नाजमीन पठाण या विद्यार्थिनीने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक प्राप्त केले आहे,
सदर विद्यार्थिनीचा महाविद्यालयाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात (गोवर्धन) आपल्या अंमळनेर विभागातील ( डीवायएसपी )श्री. सुनील नंदवाळकर साहेब यांनी तिचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला,आणि यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम करून वेगवेगळ्या परीक्षांमध्ये घवघवीत यश प्राप्त करावे,असे आव्हान विद्यार्थ्यांना त्यांनी केले.
यावेळी ग्रामविकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आबासो. श्री. जयवंतराव मन्साराम पाटील, उपाध्यक्ष आबासो. श्री. देविदास शामराव पाटील, संस्थेचे सेक्रेटरी आबाजी देविदास बारकू पाटील तसेच सर्व संचालक मंडळ आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले व सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक करून अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *