मराठी विद्रोही साहित्य संमेलनात श्रोत्यांनी वैचारिक साहित्य मेजवानीचा लुटला आनंद..
![]()

मराठी विद्रोही साहित्य संमेलनात श्रोत्यांनी वैचारिक साहित्य मेजवानीचा लुटला आनंद..
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
१८ वे मराठी साहित्य संमेलनाचे दोन्ही भव्य सभामंडपात श्रोत्यांची प्रचंड उपस्थिती असून बैठक व्यवस्था अपूर्ण पडत असल्याने नागरिक खाली बसून वैचारिक साहित्य मेजवानीचा आनंद लुटत आहेत.
विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला मिळणारा उस्फुर्त प्रतिसाद लक्षवेधी ठरलेला आहे.तर केकी मूस कलादालनातील भव्य चित्र प्रदर्शन, छायाचित्र व खान्देशी संस्कृती, आंबेडकरी चळवळ चित्र प्रदर्शन, एतीहासिक शिवकालीन शस्त्र प्रदर्शनासह अनेक नामवंत कलाकार विविध कलेचे प्रकार प्रत्यक्ष सादर करत असल्याने कलाप्रेमिंची मोठ्या प्रमाणावर गर्दी या दालनात आहे. ग्रंथ दालनातील पुस्तक प्रदर्शनातही वाचकांची गर्दी उसळलेली दिसत असल्याने कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरी साहित्य रसिकांच्या व सामान्यजनांच्या गर्दीने फुलून गेलेले आहे.

