शारदा माध्यमिक विद्यालयाची नाटिका ठरली लक्षवेधक!!
![]()

शारदा माध्यमिक विद्यालयाची नाटिका ठरली लक्षवेधक!!
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेरात उत्साहात सुरू झालेले आहे. या संमेलनात अनेक कार्यक्रम पार पाडले जात आहेत. बाल मेळावा अंतर्गत बालकांसाठी कथाकथन, नाट्यछटा, नाटिका, काव्यवाचन या साहित्यिक प्रकाराचे सादरीकरण बालकांच्या कलाकृतीने झाले. यामध्ये कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालय व एन. एम कोठारी कनिष्ठ महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी बाल मेळाव्यासाठी साने गुरुजींच्या जीवनावर ‘कर्मयोगी साने गुरुजी’ नावाचे सुंदर नाटक सादर केले .या नाटकाचे लेखक कळमसरे शाळेतील उपक्रमशील, लेखक, कवी, पत्रकार सोपान भवरे या सरांनी लिहिलेली होती. अत्यंत अप्रतिम अशी नाटिका त्यात साने गुरुजींचे मार्मिक प्रसंग मांडले होते. ही नाटिका कलानंद सादरीकरणातून निवड होऊन त्या नाटिकेला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्यमंचावर मान्यवरांच्या समोर सादरीकरणाची संधी आयोजकांनी दिली .या नाटकात साने गुरुजींची प्रमुख भूमिका नितीन मजगे या विद्यार्थ्याने साकारलेली होती.त्याचप्रमाणे महात्मा गांधी यांची भूमिका संजोग सोनवणे याने हुबेहूब करून दाखवली .भारत मातेची भूमिका मानसी पवार तर निवेदक म्हणून प्रगती पाटील आणि प्रिया कोळी या मुलींनी साकारलेली होती या नाटिकेसाठी शाळेमध्ये अथक परिश्रम घेण्यात आले होते .ग्रामीण भागातून सादर होणारी ही एकमेव नाटिका होती .खेड्यातील मुलांच्या कल्पकतेला वाव मिळावा या हेतूने ही नाटिका तयार केली होती. या नाटकेसाठी शाळेतील प्रशासन अधिकारी जी .टी .टाक यांनी योग्य सहकार्य केले .ह्या नाटिकेच्या सरावासाठी आज जी राठोड व एम आर तडवी सरांनी मेहनत घेतली.अनेक मान्यवरांकडून सदर नाटीकेचे कौतुक होत आहे. शाळेचे अध्यक्ष व संचालक मंडळ तसेच गावातील मंडळीकडून त्यांना शुभेच्छा मिळत आहेत.

