साने गुरुजींच्या जीवनाला अमळनेरातूनच कलाटणी- मंत्री गिरीश महाजन
![]()


साने गुरुजींच्या जीवनाला अमळनेरातूनच कलाटणी- मंत्री गिरीश महाजन
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : साने गुरुजींच्या जीवनाला अमळनेरातूनच कलाटणी मिळाली, असे विचार 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.
पूज्य साने गुरुजी साहित्य नगरीत शुक्रवारपासून सुरू झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
साने गुरुजींच्या कर्मभूमीला नमन करून संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले, 72 वर्षांनी जळगाव जिल्ह्यास साहित्य संमेलन आयोजनाचा मान मिळाला आहे, ही सर्व जळगाववासीयांसाठी अभिमानाची बाब आहे. जळगाव जिल्ह्याबरोबरच अमळनेर तालुक्याला साहित्याची परंपरा आहे. पूज्य साने गुरूजीच्या नगरीत होत असलेले भव्यदिव्य होण्यासाठी संमेलनास येणाऱ्या सर्वांना आवश्यक सोईसुविधा पुरविण्यात येत असून त्यासाठी सर्व यंत्रणा रात्रंदिवस झटत आहेत. साहित्यप्रेमींनी संमेलनास उपस्थित राहून आनंद घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
साहित्य, संस्कृती आणि खाद्यसंस्कृतीला वाहिलेल्या खान्देशची महती मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितली.

