संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज बाबाजींचा 34 वा पुण्यस्मरण नामयज्ञ संपन्न सोहळा संपन्न
![]()

संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज बाबाजींचा 34 वा पुण्यस्मरण नामयज्ञ संपन्न सोहळा संपन्न
वाघापूर ता पुरंदर : श्री क्षेत्र माणकेश्वर महादेव मंदिर वाघापूर येथे संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज बाबाजींचा 34 वा पुण्यस्मरण नाम यज्ञ सोहळा संपन्न झाला. यावेळी रुद्र अभिषेक, पादय पूजन, दिप पूजन करण्यात आले. याप्रसंगी श्री नाथजी नाथ भक्त दिगंबर दास घारे गुरुजी श्री क्षेत्र अवधूतवाडी मुळशी व उरुळी कांचन येथील सुप्रसिद्ध ह भ प डॉ.रवींद्रजी भोळे वैद्यकीय विभाग प्रमुख वारकरी मंच महाराष्ट्र राज्य, यांची सुस्राव्य प्रवचने झाली. याप्रसंगी श्रीनाथाची नाथ भक्त दिगंबर घारी महाराज यांचा सन्मान ह भ प डॉ.रवींद्र भोळे शुभ हस्ते करण्यात आला.श्री स्वामी दिव्यानंद गिरीजी महाराज माणकेश्वर मंदिर यांनी प्रास्ताविक करून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन समस्त ग्रामस्थ, पंचक्रोशी वाघापूर मंडळ यांनी केले.

