समग्र क्रांतीसाठी विद्रोही संमेलनाचे आयोजन, यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन.
कार्याध्यक्ष मुकुंद सपकाळे
![]()


समग्र क्रांतीसाठी विद्रोही संमेलनाचे आयोजन, यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन.
कार्याध्यक्ष मुकुंद सपकाळे
प्रस्थापित समाज व्यवस्था ही वंचित, बहुजन, आदिवासी, उपेक्षित यांना न्यायिक आणि निसर्गदत्त अधिकारापासून वंचित ठेवण्यासाठी अग्रेसर असून समग्र क्रांतीसाठी विद्रोही संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे या संमेलनाला यशस्वी करण्याचे आवाहन कार्याध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी भुसावळ येथे आयोजित केलेल्या बैठकी प्रसंगी व्यक्त केले बैठकीच्या अध्यक्षस्थानी सुमंगल अहिरे होते याप्रसंगी संयोजक डॉ. मिलिंद बागुल यांनी उपस्थितांना देशभरातल्या वास्तव आणि वेदना विद्रोहाची मांडणी करणाऱ्या साहित्यिकांच्या विचारांना अनुसरण्यासाठी, ऐकण्यासाठी आपण सर्वांनी बहुसंख्येने संमेलनाला येण्याचे आवाहन केले याप्रसंगी प्रा. डॉ. अनिल हिवाळे प्रा. डॉ. मुकुंद संदांनशिव व अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले याप्रसंगी सारंग पवार, दिलीप प्रधान, प्रशांत नरवाडे, विशाल सोळंके, प्रकाश मोरे,संघराज्य सपकाळे, आनंद सपकाळे, आर.पी. तायडे, सुरेश यशोदे, प्रशांत तायडे, विजय साळवे, संघराज सपकाळे, उमेश तायडे, उदय सपकाळे व अनेक मान्यवरांनी याप्रसंगी झालेल्या चर्चेत सहभाग घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बापू पान पाटील यांनी मानले.

