1 min read

शिक्षकांना सरसकट निवड श्रेणी लागू करा – खाजगी शिक्षक संघटना

Loading

शिक्षकांना सरसकट निवड श्रेणी लागू करा – खाजगी शिक्षक संघटना

अमळनेर प्रतिनिधी : राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक , तांत्रिक शाळा , अध्यापक विद्यालय यामधील शिक्षक शिक्षकेतरांना चट्टोपाध्याय वेतन आयोगाने केलेल्या शिफारशीवर आधारित त्रिस्तरीय वेतनश्रेणी प्राप्त करण्यासाठी अट क्र. 3 (क) नुसार निवड श्रेणी ही त्या त्या संस्थेतील व संवर्गातील वरिष्ठ वेतनश्रेणीतील 20% पदांनाच अनुज्ञेय आहे. तसेच त्या संवर्गातील किमान पाच पदे असणाऱ्या प्रवर्गाचाच निवड श्रेणीसाठी विचार करण्यात येतो ही बाब अन्यायकारक आहे. इंग्रजी माध्यमांच्या आकर्षणामुळे मराठी माध्यमाच्या शाळातील विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्यामुळे शिक्षकांचे अतिरिक्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. अतिरिक्त शिक्षक नवीन शाळेत रुजू झाल्यानंतर मूळ शाळेतील सेवा जेष्ठता डावलली जाते. परिणामी नवीन सेवा जेष्ठतेनुसार शिक्षकांना निवड श्रेणीचा लाभ मिळत नाही. तसेच कमी पायाभूत पदे असलेल्या छोट्या अनुदानित शाळेत मुळत: शिक्षकांची संवर्ग संख्या वरिष्ठ वेतनश्रेणीत 20 टक्के पदे उपलब्ध नसतात त्यामुळे तेथील निवडश्रेणी पात्र शिक्षकांना कधीच निवड श्रेणी अनुज्ञेय होत नाही.राज्यातील सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळतो परंतु शिक्षकांना तो मिळत नाही. म्हणूनच किमान निवड श्रेणीचा लाभ सरसकट करणे आवश्यक आहे. राज्यातील खाजगी आनुदानित शाळांतील डीएड किंवा बीएड अहर्ताधारक शिक्षकांना सरसकट निवडश्रेणी लागू करावी यासाठी महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष ज्ञानदेव हांडे यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर व शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांना पत्र लिहून मागणी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास संघटना राज्यव्यापी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *