जि.प. प्रा.शाळा ,दहिगाव येथे आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
![]()

जि.प. प्रा.शाळा ,दहिगाव येथे आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री अर्जुन कडू अडकमोल यांच्या हस्ते करण्यात आले .सर्वप्रथम गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी लेझीम चे प्रात्यक्षिक उत्कृष्टरित्या सादर केले.तसेच काही विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांच्या वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले .इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाविषयी चे भाषण आत्मविश्वास पूर्ण दिले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य , गावचे सरपंच माननीय अजय भाऊ अडकमोल, तसेच दहिगाव केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय ठाकूर दादा ,शाळेच्या ग्रेडेड मुख्याध्यापिका श्रीमती सरिता जाधव मॅडम व सर्व शिक्षक उपस्थित होते.

