1 min read

प्रजासत्ताक दिनी झारखंड राज्य संस्कृती व राष्ट्रास योगदान पर नृत्य सादरीकरण

Loading

प्रजासत्ताक दिनी झारखंड राज्य संस्कृती व राष्ट्रास योगदान पर नृत्य सादरीकरण

दिनांक 26 जानेवारी 2024, शुक्रवार रोजी श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित सु.अ.पाटील प्राथ. व यशवंत माध्य.आणि उच्च माध्य.आदिवासी आश्रम शाळा पिंपळे येथे प्रजासत्ताक दिनी माननीय मुख्यमंत्री “माझी शाळा सुंदर शाळा” उपक्रमांतर्गत झारखंड राज्य संस्कृती दर्शन व राष्ट्राचे योगदानपर नृत्य सादरीकरण केले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून,प्राथ व माध्य मुख्या.श्री अविनाश अहिरे सर व श्री‌ उदय पाटील सर यांच्या मार्गदर्शनाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.कार्यक्रमात झारखंड राज्याचे राष्ट्रासाठी योगदान व संस्कृतीचे दर्शन घडवत विद्यार्थ्यांनी खेळ, क्रांतिकारक, उद्योग इत्यादी क्षेत्रातील योगदान असणाऱ्या विभूतींची वेशभूषा केली तसेच तेथील सण व उत्सवांची प्रतिकृती तयार करून सादरीकरण केले. सदर नृत्याचे दिग्दर्शन माधुरी पाटील यांनी केले. देखावा तयार करण्याकरिता उच्च माध्यमिक शिक्षक हेमंत पाटील, स्वप्निल हिम्मतराव पाटील, प्रतीक पाटील, प्राथ शिक्षक रविंद्र नेरकर, नितीन सोनवणे ,आशिष निकम व अविनाश पाटील, चेतन पाटील यांचे अनमोल असे सहकार्य लाभले.तसेच‌ प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक सहकारी शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता प्रयत्न केले. साऊंड सिस्टिम चे काम यशस्वीपणे सुनील भोई यांनी पार पाडले.सदर कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे सचिव आदरणीय नानासाहेब श्री युवराज दगाजीराव पाटील साहेब ,पिंपळे बुद्रुक येथील पोलीस पाटील श्री.दिलीप साहेबराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांनी कार्यक्रमास प्रोत्साहन देत विद्यार्थ्यांच्या
कलागुणांचे कौतुक केले. संस्थेचे
अध्यक्ष आदरणीय ताईसो विद्याताई
युवराज पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *