1 min read

३४ रस्ता सुरक्षा अभियान निमित्त जनता इंग्लिश स्कूल दिंडोरी येथे कार्यशाळा संपन्न.

Loading

३४ रस्ता सुरक्षा अभियान निमित्त जनता इंग्लिश स्कूल दिंडोरी येथे कार्यशाळा संपन्न.

नाशिक (मनिलाल शिंपी)नाशिक जिल्हा पोलीस अधिक्षक माननीय ,श्री.धिवरे साहेब यांचा मार्गदर्शनाखली एस. पी.ऑफिस,चे सहायक पोलीस निरीक्षक श्री.प्रविण पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली, आर एस पी चे ठाणे, पालघर, आणि नाशिक विभागिय कमांडर डॉ. मनिलाल शिंपी,ठाणे, नवी मुंबई,नाशिक विभाग प्रमुख श्री.दिलीप स्वामी यांचा सहकार्याने, दिंडोरी येथील जनता इंग्लिश स्कूलमध्ये रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करून अपघात मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळून देशाचे रक्षण करणे आवश्यक आहे, व तशी सर्व विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा करावी असे आवाहन केले.आर एस पी अधिकारी युनिट ठाणे,नवीमुंबई जिल्हा विभागीय आर एस पी समादेशक दिलीप स्वामी यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले. हेल्मेट नसेल तर गाडी चालवणे टाळा विना हेल्मेट गाडी चालवू नका असेही मनिलाल शिंपी यांनी सांगितले. आपली सुरक्षा हीच आपल्या परिवाराची सुरक्षा आणि देशाची सुरक्षा यासाठी आपण वाहतुकीचे नियम आपल्या घरातून पाळणे आवश्यक आहे अशी माहिती विद्यार्थ्यांना मनिलाल शिंपी दिली.आर एस पी अधिकारी योगेश अहिरे, नाशिक वाहतूक शाखेचे वाहतूक पोलीस कर्मचारी उपस्थित होते.शाळेचे मुख्याध्यापक वडजे सर यांनी विशेष सहकार्य केले,तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी आर एस पी ऑफिसर ठाणे श्री योगेश अहिरे, प्रवीण भंडारकर, प्राचार्य रमेश वडजे,उपप्राचार्य उत्तम भरसट, परिवेक्षिका श्रीमती शिंदे मॅडम सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचलन सरला कदम यांनी केले उपस्थित सर्व मान्यवर व विद्यार्थ्यांचे विरकर एस एम यांनी आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *