1 min read

मनोज जरांगे यांच्या लढयाला यश. नवी मुंबईत जल्लोष!
स्वागतासाठी जेसीबी सज्ज.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अध्यादेश स्वीकारणार. मुख्यमंत्री वाशीत दाखल.

Loading

मनोज जरांगे यांच्या लढायला यश. नवी मुंबईत जल्लोष!
स्वागतासाठी जेसीबी सज्ज.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अध्यादेश स्वीकारणार. मुख्यमंत्री वाशीत दाखल.

मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला फार मोठे यश प्राप्त झालेले आहे. महाराष्ट्र शासनाने मध्यरात्री अध्यादेश पारित करून मराठा आंदोलकांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्यामुळे वाशीमध्ये रात्री जल्लोष सुरू झाला आणि आंदोलनाचे रूपांतर विजयी रॅलीत झाले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे आपले उपोषण सोडणार आहेत, मुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते अध्यादेश मनोज जरांगे स्वीकारणार आहेत. हा फार मोठा विजय मराठा आंदोलकांचा आहे. छत्रपती शिवाजी चौकात लाखो मराठा आंदोलन मोठ्या आनंदाने एकत्र झालेले आहेत. आंतरवाली ते मुंबई हा प्रवास खडतर होता परंतु मी विजय होणार याचा विश्वास मनोज जरांगे यांनी व्यक्त केला होता. आणि व हा आत्मविश्वास त्यांनी सार्थ करुन दाखवला.
मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी अंतरावली ते मुंबई या रस्त्यामध्ये अनेक समर्थकांनी जेसीबीने फुले उधळून त्यांचे स्वागत केले होते. एक अनोखा मराठा नेता मनोज जरांगे यांच्या रुपाने आम्हाला मिळाला अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया अभय ठाकरे यांनी व्यक्त केली. फुलांची उधळण करून आपल्या नेत्यांना स्वागत करून रस्ता मोकळा करून दिला जात होता
महायुती सरकारने मान्य केल्या म्हणून मध्यरात्रीचा फटाके फोडून दिवाळी साजरी करण्यात आली. अध्यादेश काढण्यात आले . मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मंत्री दीपक केसरकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मराठा आरक्षणासंदर्भातील राजपत्र मनोज जरांगे यांना सुपूर्द करण्याची घोषणा करण्यात आली . यानंतर मनोज जरांगे यांनी मध्यरात्री पत्रकारांशी संवाद साधला.

मराठा बांधवांचा जल्लोष सुरू. मराठवाड्यात नोंदी सोडवलेली शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे. कुणबी नदी सापडलेला प्रमाणपत्र प्राप्त होणार प्रमाणपत्रासाठी अध्यादेश जारी करण्यात आल्यानंतर वाशीमध्ये मराठा आंदोलकांचा मोठा जल्लोष सुरू झालेला आहे लढा यशस्वी झाल्यानंतर विजय रॅली काढणार आहेत आगामी आधीवेशनात कायदा पारित केला जाणार आहे. ओबीसी अंतरवाली सराटीसह राज्यात दाखल गुन्हे मागे घेणार 54 लाख कुणबी नोंदी सापडलेला प्रमाणपत्र मिळणार. मनोज जरांगे यांचे औक्षण करून जल्लोष केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *