पिंपळे रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे यासाठी पिंपळेरोड कृती समितीच्या वतीने मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना निवेदन
![]()

पिंपळे रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे यासाठी पिंपळेरोड कृती समितीच्या वतीने मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना निवेदन
अमळनेर प्रतिनिधी
पिंपळेरोड कृती समितीच्या वतीने मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना निवेदन
दिले असून काम दर्जेदार व्हावे अशी अपेक्षा कृती समितीच्या नागरिकांनी निवेदन देऊन केली आहे.
गुरुवारी मुख्य पिंपळेरोड रस्त्याचे क्रॉक्रीटीकरणाचे काम करण्यास पालिकेने सुरुवात केलेली आहे. पिंपळेरोडच्या पिंपळेरोडच्या
नागरिकांना पुर्वीच्या अनुभवानुसार डांबरी करणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते. परंतु ६ महिन्यातच सदर कामाची दुरावस्था झाली होती. व
त्यामुळे नागरिकांचे खुप हाल झाले होते. अंदाजित ६० लाख रुपये किंमतीचे काम कार्यान्वित यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभाग अमळनेर यांनी केले होते. त्या निकृष्ट रस्त्यांच्या संदर्भात यापुर्वी आपण वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभाग अमळनेर यांच्याशी दुरुस्ती संदर्भाबाबत आपल्या स्तरावरुन पत्रव्यवहार केलेला आहे. आता सदर कामाची कार्यान्वित यंत्रणा अमळनेर नगरपरिषद असल्याने आपल्याकडुन कामाची गुणवत्ता
राखण्यात यावी. अशी अपेक्षा सर्व पिंपळे रोडवरील त्रस्त नागरिकांची अपेक्षा आहे. तरी पिंपळेरोडच्या क्रॉक्रीटीकरणाचे काम गुणवत्ता पूर्वक करण्यात यावी मागणीचे निवेदन दिले आहे. यावेळी माजी नगरसेवक विवेक पाटील, संदीप सोनवणे , हर्षल पाटील, जयवंत पाटील, , प्रकाश पाटील, भास्कर बोरसे, राकेश बडगुजर, हर्षल पाटील, जयेश पाटील, प्रदीप पाटील, संजय पाटील, रमेश पाटील, महेश पाटील, संजय पाटील, प्रभाकर बोरसे, अशोक पाटील, नंदलाल पाटील, रविंद्र बडगुजर, अशोक पाटील यांच्यासह अनेक नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

