1 min read

मराठी रंगभूमी समृद्ध करण्यासाठी
तरुण पिढीने नाटक पाहण्यासाठी नाट्यगृहात यावे ! प्रदीप कबरे

Loading

मराठी रंगभूमी समृद्ध करण्यासाठी
तरुण पिढीने नाटक पाहण्यासाठी नाट्यगृहात यावे ! प्रदीप कबरे

मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)

मराठी नाटक पाहण्यासाठी तरुण पिढी नाट्यगृहात आली पाहिजे आणि मराठी भाषा व मराठी साहित्य, संस्कृती टिकवली पाहिजे असे प्रतिपादन मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ कलाकार व लेखक प्रदीप कबरे यांनी केले.
गुरु प्रोडक्शन निर्मित ” दिल धक धक करे” या विनोदी नाटकाचा संयुक्त द्विशतक महोत्सवी प्रयोग नुकताच मिरा रोड येथील लता मंगेशकर नाटय़गृहात पार पडला. या प्रसंगी मराठी नाट्य रसिकांना आपल्या नाटकांनी मंत्रमुग्ध करून गेली पन्नास वर्षे रसिकांच्या मनावर राज्य करणारे कलाकार प्रदीप कबरे यांनी मराठी रंगभूमीच्या संपन्नतेबद्दल गुणगौरव करताना तरुण प्रेक्षक मात्र रंगभूमीवर पाठ फिरवत आहेत अशी खंत व्यक्त केली. नाट्य प्रयोग संपल्यानंतर आपले मनोगत नाट्य रसिकां समोर व्यक्त केले. मागील पन्नास वर्षांचा मराठी रंगभूमीचा इतिहास उलगडत दर्जेदार मराठी साहित्याची महती स्पष्ट केली. या मराठी भाषेला अद्याप अभिजात राज्य मराठी राज्य भाषेचा दर्जा प्राप्त न झाल्याबद्दल हळहळ व्यक्त केली.
आजच्या काळात मिरा-भाईंदर सारख्या ठिकाणी मा. आ. प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने कला, साहित्य, संस्कृतीचा आदर करणाऱ्या राज्यकर्त्यांकडून उत्कृष्ट दर्जाचे लता मंगेशकर नाटय़गृह निर्माण झाल्याचा उल्लेख प्रदीप कबरे यांनी आपल्या मनोगतात केला. आजचे राज्यकर्ते कलाकारांचा सन्मान करतात, वेळोवेळी अनेक सुविधा रंगभूमीसाठी उपलब्ध करुन देतात याबद्दल समाधानही व्यक्त केले परंतु दुर्दैवाने आज नाटक पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या कमी झाली. नाटक पहायला येणारा प्रेक्षक हा वयाची पन्नाशी उलटलेला असतो तरुण पिढी मात्र नाटक पाहण्यासाठी नाट्यगृहात येत नाही याबद्दल असलेली खंत नाट्यप्रेमापोटी व्यक्त केली. महाविद्यालयातून तसेच अनेक नाट्यप्रेमी संस्था कडून विविध नाट्य व एकांकिका स्पर्धांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केले जाते. अनेक तरुण विद्यार्थी उत्साहाने अशा नाट्य, एकांकिका स्पर्धेमध्ये सहभागी होतात, आपल्या अभिनयाची छाप पाडतात पण ही तरुण पिढी नाट्यगृहात का येत नाही? असा प्रश्न उपस्थीत केला. तरुण पिढीने आपल्या मराठी रंगभूमीच्या संवर्धनासाठी आणि विकासासाठी प्रयत्न केले पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, ध्वनी व्यवस्था, तंत्रज्ञान यांच्यावापरामुळे रंगभूमी संपन्न झाली आहे व लवकरच ती प्रेक्षकांच्या प्रेमामुळे समृध्द होईल असा आशावाद नाट्य कलाकार प्रदीप कबरे यांनी ” दिल धक धक करे” या नाट्य प्रयोगाच्या प्रसंगी काढले.
नाट्य प्रयोगाच्या समारोप प्रसंगी नाटकात भूमिका सादर करणारे कलाकार, पाठबळ देणारे राजकीय, सामाजिक व्यक्ती तसेच तंत्रज्ञ यांचा यथोचित सत्कार या प्रसंगी करण्यात आला. तसेच नाट्यगृहाचे व्यवस्थापक श्री. गबाळे यांनी खुप सहकार्य केले याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद लाभलेल्या या प्रयोगास प्रमुख आतिथी म्हणून वसई विरार महानगर पालिकेच्या प्रथम महिला महापौर मा. प्रविणाताई ठाकुर तसेच बविआचे प्रवक्ते मा. अजिवजी पाटील, पक्षाचे माजी पदाधिकारी मा. अविनाशजी गुरव व मा. यासिन (मुन्ना) शेख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *