1 min read

व्हि.एस पवार इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

Loading

व्ही एस पवार इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये स्नेहसंमेलन उत्साहात साजरे
रामवाडी येथे सुरू असलेल्या दुर्गा फाऊंडेशन संचलित कै. दादासाहेब व्ही एस पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये काल दिनांक २१/०१/२०२४ रोजी स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन सौ जयश्री ताई पाटील(मा. जिल्हा परिषद सदस्य) व सोनी दीदी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सौ मंदाकिनी भामरे, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, आशा चवरिया,जिल्हा समन्वयक राष्ट्रवादी काँग्रेस, श्री अविनाश पाटील चेअरमन गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल, मूडी, सुनीता वानखेडे,सामाजिक कार्यकर्त्या हे होते. सर्व मान्यवरांचे संस्थेचे चेअरमन श्री उत्कर्ष पवार व सचिव सौ अलका पवार तसेच शाळेच्या प्राचार्या सौ. वर्षा सोहिते यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी अध्यक्षीय भाषणात जयश्री ताई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने करण्यात आली. कार्यक्रमात विविध प्रकाचे नृत्य व नाटिका विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आल्या. विशेष म्हणजे कडाक्याची थंडी असुनही पालक व प्रेक्षक वर्ग शेवटपर्यंत जागेवर खिळून बसले होते. एका पेक्षा एक सरस नृत्य यावेळी विद्यार्थ्यांनी सादर करत प्रेक्षक वर्गांची दाद मिळविली.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन स्वाती चव्हाण व मनीषा सोनार यांनी केले. नृत्य दिग्दर्शन योगिता पाटील, पल्लवी येवले, मनीषा शिरसाठ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष श्री उमाकांत पाटील,श्री पवन संतोष पाटील,योगिता फाळके, सुवर्णा पाटील, संगीता पाटील, भारती गव्हाणे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांना संस्थेच्या सचिव अलका पवार व प्राचार्या वर्षा सोहिते यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *