1 min read

श्रीराम प्राणप्रतिष्ठानिमित्त मंगळग्रह मंदिरात सुंदरकांड

Loading

श्रीराम प्राणप्रतिष्ठानिमित्त मंगळग्रह मंदिरात सुंदरकांड

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील श्री. मंगळग्रह मंदिरात अयोध्या येथील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मनोहारी सजावट करण्यात आली. संगीतमय सुंदरकांडही दीर्घकाळ म्हणण्यात आले. यानिमित्ताने श्री. मंगळग्रह देवतेला प्रभू श्रीरामचंद्राचे रुप देण्यात आले होते.मंदिरातील टाळ, मृदुंग, चिपळी व नालच्या गजरात संगितमय सुंदरकांड मुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. मंदिराच्या गाभाºयात आकर्षक व सुंदर फुलांची मनमोहक सजावट करण्यात आली होती. भव्य आकाशकंदील लक्ष वेधून घेत होता. मंदिर परिसरात भगवे ध्वज लावून संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. भाविकांसाठी श्रीरामाची व पंचमूखी हनुमानाची प्रतिकृतीही उभारण्यात आली होती. दिव्यांच्या आकर्षक रोषनाईने संपूर्ण परिसर लखलखाटत होता.
यशस्वीतेसाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, जयश्री साबे यांचे अनमोल सहकार्य लाभले. मंदिराचे पुरोहित शुभम वैष्णव, यतिन जोशी, जयेंद्र वैद्य, तुषार दिक्षित व गणेश जोशी यांनी सुंदरकांडचे पठण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *