1 min read

प्रताप महाविद्यालयात भूगोल दिवस उत्साहात साजरा

Loading

प्रताप महाविद्यालयात भूगोल दिवस उत्साहात साजरा

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात १४ जानेवारी रोजी भूगोलशास्त्र विभागातर्फे भूगोल दिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भूगोलशास्त्र विभाग प्रमुख डॉ. कैलास निळे तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून प्रा. विजयसिंग ल पवार यांची उपस्थिती होती. प्रा.पवार यांनी “अवकाशावर बोलू काही” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात याचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. किरण गावीत यांनी केले. प्रमुख पाहुण्याचा परिचय डॉ. प्रमोद चौधरी यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. महेंद्र महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तसेच प्रा. अमित शिरसाठ, प्रा. चंद्रकांत जाधव व प्रा. भूषण पवार, श्री प्रवीण धनगर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *