1 min read

बहूजन जागृतीचा ध्यास घेतलेले व्यक्तिमत्त्व सोपान भवरे

Loading

वाढदिवस विशेष
आपल्या उत्कृष्ट लेखन शैलीमुळे संपूर्ण अमळनेर करांच्या हृदयात स्थान मिळवलेले लेखक, संपादक, दिग्दर्शक, माननीय श्री सोपान भवरे सर यांचा आज १७ जानेवारी रोजी वाढदिवस आहे.
लिखाणाची अफलातून स्टाइल व मित्र जोडण्याची अफलातून कला यामुळे भवरे सर म्हणजे विनोदाचं हुकमी पान बनले आहे. आत्तापर्यंत त्यांनी स्वातंत्र्याची ऊर्जाक्षरे या पुस्तकात स्वातंत्र्योत्तर काळातील स्वातंत्र्य सैनिकाचे योगदान हा लेख लिहिला आहे. मुख्याध्यापक संघ पत्रिकेत आजची शैक्षणिक परिस्थिती हा लेख लिहिला आहे. बा तथागत या पुस्तकात समीक्षात्मक लेख लिहिला आहे. बौद्ध साहित्य परिषद स्मरणिका तयार करण्यात योगदान आहे. शब्दाक्षरे दिवाळी अंकात महात्मा फुलेंची सत्यशोधक चळवळ लेख लिहिला आहे. काव्य दर्पण मध्ये साहित्य आनंदाची कला कृती अशा पद्धतीने त्यांचे लेख वाचकांपर्यंत पोहचविले आहेत. त्याचबरोबर लेखन मंच साप्ताहिकाचे ते उपसंपादक आहेत.मराठी लाईव्ह ,रयत जगत,तरुण भारत ,साईमत, पुढारी, प्रशिक ,सायंप्रभा ,लोक जगत तसेच दैनिक वर्तमानपत्रातून
संपूर्ण जळगांव जिल्ह्यात ,तालुक्यात आपल्या धारदार लेखणीने व निर्भीड पत्रकारितेने आपल्या लेखनातून अन्यायाविरुद्ध वाचा फोडून सामान्यांच्या अडीअडचणींना दुर करणारे सच्चे पत्रकार,कुशल संघटक आहेत त्यामुळे त्यांना चाहत्यांनी डोक्यावर घेतली आहेत. पत्रकारितेबरोबरच उत्तम लेखनामुळेही त्याचे लेख लोकप्रिय झाले आहेत.
तुमचे अभिनंदन करण्यात आम्हा सर्वांना आनंद होत आहे .आम्ही आमच्या हृदयाच्या तळापासून सांगू इच्छितो कोणतीही अतिशयोक्ती न करता: “तुमची सर्व लेख चांगली आहेत!”
एक दिवस असा येवो ll
तुम्ही जगप्रसिद्ध लेखक होवो ll ऑटोग्राफ साठी आम्ही सगळे तुमच्या मागे येवो ll
एका अद्भुत लेखकाला, दयाळू आणि आदरणीय व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आई भवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना..
🎊🎉 जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎊

शुभेच्छुक:
श्री आर.जी.राठोड
उपशिक्षक
शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *