1 min read

माझा प्रभाग पतंग महोत्सव जल्लोषात साजरा…!

Loading

माझा प्रभाग पतंग महोत्सव जल्लोषात साजरा…!

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील श्रीकृष्णपुरा, वडचौक, सावतावाडी, शारदाकॉलनी श्रीरामकॉलनी, शिवाजीनगर व परिसरातील नागरिक, बाळ गोपाळ व महिला मंडळींसाठी सालाबादप्रमाणे खास मकरसंक्रांती निमित्ताने माजी नगरसेवक विक्रांत पाटील व समाजसेविका सौ. स्वप्ना पाटिल यांनी माझा प्रभाग पतंग महोत्सव आयोजित केला होता त्यात सर्वांना मोफत पतंग देवून सर्वाँनी जोशपुर्ण उत्सवात पतंग उडवून डी. जे. च्या तालावर डान्स,नाचत आनंद घेतला.
सदर पतंग महोत्सवाचे फुगे व पतंग हवेत सोडून माजी आमदार श्रीमती स्मिता वाघ यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी भेट देण्यासाठी खान्देश शिक्षण मंडळाचा उपाध्यक्ष सौ. माधुरी पाटिल, माजी मार्केट प्रशासक सौ. तिलोत्तमा पाटिल, उद्योगपती सौ. लीना पाटिल, सौ. रंजना महाजन, कविता मराठे, शितल सोनार, वैशाली कुलकर्णी, नलिनी बारी, प्रतिभा बारी, राजसबाई भोई, वर्षा पाटील, जयमाला धनगर, प्रतिभा पगारे, सौ. नलिनी ईश्वर पाटिल, विद्या पाटील यांचेसह प्रभागातील नागरीक, बाल गोपाळ मोठया संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचलन श्री प्रकाश महाजन सर यांनी तर स्वागत व आभार शिवम साळी, योगीराज चव्हाण यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *