1 min read

डॉ. वंदना भामरे यांना बी. एन. वाफारे आंतरराष्ट्रीय पुरस्कार

Loading

डॉ. वंदना भामरे यांना बी. एन. वाफारे आंतरराष्ट्रीय पुरस्कार

जळगाव : प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथील शिक्षीका डॉ. वंदना भामरे यांना प्रतिष्ठेचा बी.एन. वाफारे आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाला असून त्यांना हैद्राबाद येथील
आंतरराष्ट्रीय परीषदेत तो प्रदान करण्यात आला.

डॉ. वंदना भामरे आणि एसएसव्हीपीएस सायन्स कॉलेज धुळे येथील गणित विषयातील प्रा.डॉ.एम.एम.पवार यांना 2023 सालच्या 89 व्या आंतरराष्ट्रीय संमेलनात बी.एन. वाफारे पुरस्कार जाहिर झाला.

बीआयटीएस पिलानी, हैदराबाद कॅम्पस येथील मॅथेमॅटिकल सोसायटीने “कव्हरिंग एनर्जी ऑफ पोसेट अँड इट्स बाउंड, मॅथेमॅटिका बोहेमिकामध्ये प्रकाशित केलेल्या उत्कृष्ट शोधनिबंधासाठी प्रा. पी. के. त्रिविक्रम यांनी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान केला. सन्मानपत्र आणि रोख पुरस्कर रु. 25000/- याचा पुरस्कारात समावेश आहे. प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी.जैन आणि सहकारी शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *