1 min read

मुख्यमंत्री ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत किशोरवयीन विद्यार्थिनींकरिता मासिक पाळी व्यवस्थापन व समुपदेशनपर व्याख्यानाचे आयोजन

Loading

मुख्यमंत्री ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत किशोरवयीन विद्यार्थिनींकरिता मासिक पाळी व्यवस्थापन व समुपदेशनपर व्याख्यानाचे आयोजन

श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित सु.अ.पाटील प्राथ.आणि यशवंत माध्य.व उच्च माध्य.आदि.आश्रमशाळा पिंपळे येथे दि 13 जाने.2024 वार शनिवार रोजी माननीय मुख्यमंत्री‌ श्री एकनाथजी शिंदे यांच्या माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत किशोरवयीन विद्यार्थिनींकरिता मासिक पाळी व्यवस्थापन व समुपदेशन पर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर मार्गदर्शनपर व्याख्यानाकरिता अमळनेर येथील नामांकित साने गुरुजी कन्या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका आदरणीय ताईसो अनिता बोरसे मॅडम यांना आमंत्रित करण्यात आलेले होते. अनिता बोरसे मॅडम यांची जिल्हास्तरावर मासिक पाळी व्यवस्थापन व समुपदेशन प्रशिक्षणाकरिता मास्टर ट्रेनर म्हणून निवड करण्यात आलेली आहे. सदर विषयासंबंधी मॅडमांनी विद्यार्थिनींना विविध खेळ, प्रश्नावली इत्यादी माध्यमातून बोलते करून त्यांचे मासिक पाळी संबंधी असणारे समज- गैरसमज, अंधश्रद्धा, योग्य उपाययोजना काय? कशी करावी? काळजी काय घ्यावी? आहार कसा असावा? इत्यादी विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा‌ ताईसौ विद्याताई युवराज पाटील मॅडम यांची विशेष उपस्थिती होती. अध्यक्ष मॅडमांनी उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांनींना उज्वल व उत्तम आरोग्या करिता शुभेच्छा दिल्या‌. सदर कार्यक्रमप्रसंगी प्राथ.शिक्षिका सविता मुळे, सीमा चौधरी, अधिक्षिका विद्या पाटील हजर होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उच्च माध्य. शिक्षिका माधुरी पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *