1 min read

अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संपाच्या पार्श्वभूमीवर मंत्री मा.अनिल पाटील यांना दिले निवेदन

Loading

अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संपाच्या पार्श्वभूमीवर मंत्री मा.अनिल पाटील यांना दिले निवेदन

अमळनेर प्रतिनिधी
राज्यासह जिल्ह्यातील सुमारे आठ हजार अंगणवाडी कर्मचारी आणि किमान वेतन लागू करावे,सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेन्शन द्यावी, मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना ग्रॅच्यूटीचा लाभ देण्यात यावा,नवीन मोबाईल पुरविण्यात यावेत.
आदी मागण्यांसाठी गेल्या ३८ दिवसापासून संपावर आहेत.वरील मागण्यांवर चर्चा करणेसाठी वरिष्ठ पातळीवर अनेक बैठकी झाल्या परंतु शासनाने समाधानकारक तोडगा न काढल्याने संप सुरूच आहे.
संपाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा. श्री.अनिल दादा पाटील यांना त्यांच्या निवास्थानी संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टंमडळाने निवेदन देऊन संपावर तोडगा काढण्याची विनंती केली.
यावर मंत्री महोदयांनी अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या प्रलंबित मागण्यापैकी काही मागण्या शासनाने मंजूर केल्या असून पेंशन आणि ग्रॅच्यूटी देण्याबाबत शासन सकारात्मक विचार करत असल्याचे स्पष्ट करत संप मागे घेण्याचे आवाहन केले.
शिष्टमंडळात श्रीमती सुलोचना पाटील,उषा पाटील,जनाबाई पाटील,छोट्याबाई शंकपाळ,चंदनताई पाटील,शैला सोनवणे, दीपमाला पाटील,शबाना पिंजारी,आदीसह अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *