1 min read

साने गुरुजी कन्या हायस्कुल येथे मोफत रक्तगृप तपासणी शिबीर उत्साहात .

Loading

साने गुरुजी कन्या हायस्कुल येथे मोफत रक्तगृप तपासणी शिबीर उत्साहात .

अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे साने गुरुजी कन्या हायस्कुल , अमळनेर शाळेत माझी शाळा , सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ व नर्मदा फॉन्डेशन यांच्या सयुंक्त विद्यमाने रक्तगट तपासणी शिबीर करण्यात आले . अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव मा. दादासो . संदिप घोरपडे सर होते , प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष आबासो . हेमकांत पाटील ,मा. डॉ. अनिल शिंदे , डॉ. मयुरी शिंदे -जोशी ( नर्मदा फॉउडेशन ) , आबासो . भास्करराव बोरसे , दादासो . किरण पाटील , दादासो . मगन भाउसाहेब , दादासो . डॉ . शेख सर , दादासो . एम . एस . चौधरी , शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे मॅडम व्यासपीठावर विराजमान होते . दादासो किरण पाटील यांचा सहकार्याने या शिबाराचे आयोजन करणात आले होते . प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे मॅडम यांनी मांडले . १२ जानेवारी राजमाता जिजामाता व युवा प्रेमी स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरा करतांना फोटोला माल्यार्पन करून प्रतिमा पुजन केले . प्रमुख पाहुणे डॉ. मयुरी जोशी यांनी राजमाता जिजाऊ यांच्या बद्दल माहिती देवून रक्तगट बद्द्दल मार्गदर्शन केले . त्यानंतर डॉ. अनिल शिंदे यांनी रक्तदान करण्याचे फायदे सांगुन कितीही वेळेस रक्तदान करता येते याबद्दल माहिती दिली . अध्यक्षीय भाषणात दादासो . संदिप घोरपडे सर यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्याविषयी माहिती दाखले देऊन मार्गदर्शन केले . तसेच रक्तगट तपासणी किती महत्वाची आहे त्याबद्दल अनमोल मार्गदर्शन केले . रक्तगट तपासणी कामी नर्मदा फॉन्डेशन च्या कर्मचारी यांनी सहकार्य केले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक , शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीनींनी सहकार्य केले . सुत्रसंचालन श्री. जे.एस. पाटील सर तर आभार श्री. मुकेश अमृत पाटील सर यांनी केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *