पिंपळे आश्रम शाळेत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमा अंतर्गत वाचन महायज्ञाचे उत्साहात आयोजन
![]()
पिंपळे आश्रम शाळेत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमा अंतर्गत वाचन महायज्ञाचे उत्साहात आयोजन
आश्रम शाळेत नेहमी नवनवीन उपक्रम राबविले जात असतात, महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या विशेष उपक्रमा अंतर्गत दि. 10 जाने 2024 रोजी सु.अ.पाटील प्राथमिक व यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा पिंपळे बु” येथे शैक्षणिक गुणवत्ता समिती व शिक्षकवृंदाचा सहाय्याने विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्ये विकासाबरोबरच बौद्धिक विकास होवून, त्यांचा सर्वांगीण विकासास चालना मिळण्यासाठी, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, त्यांना साहित्याप्रति अभिरुची निर्माण व्हावी,वाचनाची गती वाढवावी, वाचनातून संस्कार आणि व्यक्तिमत्त्व विकास व्हावा,त्यांच्या सामान्य ज्ञानात भर पडावी त्यांचे ज्ञान वृद्धिंगत व्हावे यासाठी पिंपळे बु आश्रम शाळेत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमा अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यातलाच हा एक उपक्रम यावेळी राबविण्यात आला.वाचना बरोबरच गणिती संकल्पनांचा बोध होणे असा हेतू ठेवून विद्यार्थ्यांना वर्गनिहाय भौमितिक आकारात मैदानावर बसवून सामूहिक “एक तास, वाचनासाठी खास”म्हणून सामुहिक वाचन करण्यासाठी बसवण्यात आले यावेळी विद्यार्थी एकाग्रतेने वाचन करत होते सदर उपक्रमासाठी सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.


