1 min read

२०१८ ते २०२३ मध्ये शेडनेट / पॉली हाऊस मध्ये झालेल्या भ्रष्ट्राचाराबाबत कोणत्याही प्रकारची चौकशी न केल्यामुळे
प्रजासत्ताक दिनाला आंदोलन..

Loading

२०१८ ते २०२३ मध्ये शेडनेट / पॉली हाऊस मध्ये झालेल्या भ्रष्ट्राचाराबाबत कोणत्याही प्रकारची चौकशी न केल्यामुळे
प्रजासत्ताक दिनाला आंदोलन..

तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन

२६ जानेवारी २०२४
रोजी शेतक-यासोबत खड्डा करुन स्वतःला गाडुन घेऊन मागण्या मान्य
होईपर्यंत करणार अंदोलन

अमळनेर प्रतिनिधी
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व इतर नाव महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या अनुदानित शेडनेट, पॉलिहाऊस
महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ पुणे यांचे अर्थसहाय्याने राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत २०१८-१९ मध्ये शेडनेट /पॉली हाऊस
यांच्या विरुध्द तक्रार :-श्री. अशोक आधार पाटील, रा.लोण ता.अमळनेर ह.मु.धुळे,
श्री. समाधान डिगंबर शेलार, रा. अमळनेर व इतर ओम ॲग्रोचे मालक – श्री. उध्दव सर्जेराव कुवर, रा. सोनेवाडी ता. शिंदखेडा
समर्थ ट्रेडींगचे मालक – श्री. सचिन पाटील, रा. ओझर ता.निफाळ जि. नाशिक पॉलीहाऊस / शेडनेट बनविणाऱ्या कंपन्यांचे मालक व तसेच कृषी खात्यातील तात्कालीन व आजतागायतचे अधिकारी व कर्मचारी यांनी वरील योजनांमध्ये
संगणमताने अफरातफर करुन शासनाची व पिडीत शेतकऱ्यांची लयलूट झाल्याबद्दल चौकशी करुन तात्काळ कार्यवाही होणेबाबत…
वरील विषया कारणे आपणास विनंती पुर्वक अर्ज करतो ते येणे प्रमाणे,
आपणास यापुर्वी व संबंधीत विभागस वेळोवेळी पुराव्यासहीत तक्रारी करुन देखील सदर योजनेचे कुठल्याही प्रकारे शास्वत चौकशी केलेली नाही. तसेच फक्त वेळो-वेळी कार्यालयीन पत्रव्यवहार करुन वेळ वाया घालुन आम्हांला मुर्खात काढून समोरच्या भ्रष्ट्राचारी व्यक्तींना किंवा प्रामाणिकपणे काम न करणारे
कर्मचाऱ्यांना अभय देण्याचा प्रयत्न आपल्या स्तरावरुन झालेल्या पत्र व्यवहारवरुन दिसुन येत आहे.
‘त्यामुळे पिडीत शेतकरी हा दिवसेंदिवस हवालदिल होवून व कर्जबाजारी होवून मृत्युच्या दारात येवून ठेपलेला आहे. तसेच शासनाच्या तिजोरीतुन गेलेल्या पैश्यांचे शेतकऱ्यांचे हित झालेले नसुन भ्रष्ट्राचारी
बकासुरांच्या नरडयात असून जन सामान्य मानसांच्या डोक्यावर कर रुपी कर्जाचा बोजा चढत आहे. गलेलठ्ठ पगार घेवून, वातानुकुलीत ऑफीस मध्ये बसून दोन ओळीचे पत्र लिहून आमच्या सारख्या तक्रारदारांचा व पिडीतशेतकऱ्यांची अवहेलना शासकीय स्तरावरुन होतांना दिसत आहे. यामुळे आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत येणाऱ्या दि. २६ जानेवारी २०२४ स्वतंत्र भारताचा गणतंत्र दिवशी निद्रस्त सरकार व शासकीय यंत्रणेच्या विरोधात
अंदोलन करुन धिंडवळे जनते समोर आणण्यासाठी व वरील योजनेची चौकशी तात्काळ करण्यासाठी आम्ही
तहसिलदार कार्यालयाच्या आवारात खड्डा खोदुन शेतकऱ्यांसोबत स्वतःला गाडुन मागण्या मान्य होई पर्यंतअंदोलन करणार आहोत. तरी कृपया याची नोंद घ्यावी. यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास शासकीय यंत्रणा सारासार जबाबदार राहील अशी प्रत जिल्हा कृषी अधिक्षक साो. जळगांव,उपविभागीय अधिकारी साो., अमळनेर,तहसिलदार साो., अमळनेर, उपविभागीय कृषी अधिकारी साो., भाग अमळनेर,तालुका कृषी अधिकारी साो., अमळनेर पोलीस निरीक्षक साो., अमळनेर पो.स्टे.असे पत्रकात सचिन बाळु पाटील
कृ.उ.बा.समिती संचालक, अमळनेर ,
रा. तांबेपुरा, ता. अमळनेर जि. जळगांव
अनंत रमेश निकम उपशरह प्रमुख (उ.बा. ठा) अमळनेर मो.नं.७७९८१९२२२२,
रा. श्रीकृष्ण कॉलनी, प्लॉट नं. ५, नविन कोर्टाजवळ, अमळनेर जि.जळगांव
सोबत असलेले शेतकरी श्री. कैलास दगा पाटील ,श्री. नारायण रघुनाथ पाटील
श्री. ईश्वर उखुर्डु पाटील श्री. दिनेश दगा पाटील,श्री. राजेश उमाकांत पाटील ज्ञानेश्वर धनराज पाटील.सुरेश पुंडलिक पाटील ,अरुण आत्माराम भागवत
दिपक नामदेव पाटील,कन्हैयालाल झिपरू पाटील,बाळू गैभू पाटील
विक्रम बुधा पाटील हे आंदोलन करणार आहेत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *