श्री.बी.बी.ठाकरे हायस्कूल ,वावडे येथील निरंजन पेंढारे यांना नॅशनल बेस्ट सायन्स टिचर अवार्ड”
![]()



श्री.बी.बी.ठाकरे हायस्कूल ,वावडे येथील निरंजन पेंढारे यांना नॅशनल बेस्ट सायन्स टिचर अवार्ड”
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
- दि. 6 व 7 जानेवारी 2024 रोजी पार जुनागड, (गुजरात) येथे संपन्न झालेल्या 4थ्या भारतीय सायन्स टेक्नो फेक्टिवल (ISTF) मध्ये श्री . बी. बी. ठाकरे हायस्कुल वावडे ता. अमळनेर जि.जळगाव येथील उपक्रमशील विज्ञान शिक्षक तथा अमळनेर तालुका विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष निरंजन पेंढारे यांना यावर्षीचा नॅशनल बेस्ट सायन्स टिचर अवार्ड देण्यात आला. विज्ञान प्रसार च्या क्षेत्रातील रमण सायन्स अँड टेक्नोलोजी फाउंडेशन ,भारत, नॅशनल कौन्सिल ऑफ टीचर सायंटिस्ट ,इंडिया,एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौंसिल ऑफ यंग सायंटिस्ट, श्री सरदार पटेल शैक्षणिक ट्रस्ट्र, जुनागड (गुजरात) यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते .
ह्याप्रसंगी रमण सायन्स अँड टेक्नॉलॉजी फाउंडेशन चे चेअरमन डॉ. चंद्रमौली जोशी , इसरोचे माजी वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. जे.जे. रावल,डॉ.दिलिप भट,
डॉ. भरतभाई चनेरिया, चंद्रयान-3 च्या सेन्सर च्या प्रोजेक्ट हेड डॉ. माधवी ठाकरे,अमेरिकेतील नासाच्या वैज्ञानिक डॉ.रुतू पारेख ,गुजरातचे डि.आय. जी. निलेश झांझडिया,जुनागढ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ चेतन त्रिवेदी, नागपूरचे डॉ. सुरेश अग्रवाल,भारताचे प्रसिद्ध मॅथ्स गुरु डॉ. बी. एन. राव,जुनागढ चे आमदार संजयभाई कोराणिया, जुनागढ चे पोलीस अधिक्षक हर्षद मेहता,इंजि. सचिन ठाकरे, महापौर गीताबेन परमार, नॅशनल कौन्सिल ऑफ टीचर सायंटिस्टचे नॅशनल सेक्रेटरी संदीप पाटील, एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट चे व्हाईस चेअरमन सुनील वानखेडे सरदार पटेल शैक्षणिक संस्थेचे चेअरमन, एम. के. थेशिया, इ. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते
भारतीय सायन्स टेक्नो फेस्टिव्हल मध्ये संपूर्ण भारतभरातून शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून देशभरातून एकूण 11 उपक्रमशील विज्ञान शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात आला.ह्या विज्ञान महोत्सवात विद्यार्थी गटासाठी नाविन्यपूर्ण वैज्ञानिक मॉडेल सादरीकरण, सायन्स टेक्नो क्विझ, सायन्स टेक्नो स्पीच, सायंटिस्ट कॅरॅक्टर रोल प्ले हे चार इव्हेंट आयोजित करण्यात आले होते त्याचबरोबर शिक्षक गटासाठी नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्य निर्मिती व लघु विज्ञान कथाकथन हे इव्हेंट होते. विज्ञान कथा कथन मध्ये सुद्धा निरंजन पेंढारे यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले व त्यात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक प्राप्त केले.
त्यांचे डॉ. किरण कुवर शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जि. प. जळगाव ,एजाज शेख ,उपशिक्षणाधिकारी जळगाव,रावसाहेब पाटील ,गटशिक्षणाधिकारी,अमळनेर, जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी संस्थेचे चेअरमन,मानद सचिव, ,व्हा. चेअरमन,संचालक मंडळ, वावडे विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पाटील, सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद विद्यार्थी, पालक,किशोर राजे ,अध्यक्ष, जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ,अमळनेर तालुका विज्ञान अध्यापक मंडळ,गणित अध्यापक मंडळ,मुख्याध्यापक संघ, शिवशाही फाऊंडेशन,,साने गुरुजी शैक्षणिक विचार मंच,प्रतापियन प्रबोधिनी, महारष्ट्र पत्रकार संघ,महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा अमळनेर, मराठी वाङमय मंडळ, खान्देश साहित्य संघ,प्राथमिक शिक्षक संघटना,माध्यमिक शिक्षक संघटना,मित्र परिवार,वावडे, जवखेडे, मोहाडी येथील ग्रामस्थ यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे

