1 min read

इ.१२वीच्या विद्यार्थ्यांकरिता इंग्रजी विषयासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन.

Loading

इ.१२वीच्या विद्यार्थ्यांकरिता इंग्रजी विषयासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन.

जळगाव:येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात इ. १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी बोर्ड परीक्षेच्या पार्श्वभूमीवर “परीक्षेला जाताना” या उपक्रमांतर्गत इंग्रजी विषयाच्या एकदिवसीय कार्यशाळेचे आज आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेमध्ये ऍक्टिव्हिटी शीटचे स्वरूप सविस्तर विशद करून प्रत्येक प्रश्नाचे अत्यंत मुद्देसूदपणे सादरीकरण करण्यात आले. सदर कार्यशाळेत डॉ.अतुल इंगळे, डॉ.जयंत इंगळे, प्रा.योगेश धनगर व प्रा.संदीप गव्हाळे यांनी पीपीटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समर्पक मार्गदर्शन करताना ऍक्टिव्हिटी शीट सोडवत असताना कमी कालावधीत अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी नेमकी कशी तयारी करावी, वेळेचे नियोजन कसे करावे, कोणत्या घटकास प्राधान्य द्यावे, कोणत्या चुका टाळाव्यात याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कला, वाणिज्य, विज्ञान व एम.सी. व्ही. सी.विद्याशाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *