भारताच्या शिक्षण प्रवाहात मोलाचे योगदान देणारी दुसरी पणती फातिमा शेख !!
![]()

भारताच्या शिक्षण प्रवाहात मोलाचे योगदान देणारी दुसरी पणती फातिमा शेख !!
भारतात बहुजनांना ज्ञानाची कवाडे बंद केलेल्या काळात तात्यासाहेब जोतिराव फुले व सावित्रीमाई यांनी शाळा सुरु केल्या .हे बहुजनांना प्रगतीचे शिखर पार करणारे ठरले. तात्यासाहेब जोतिराव फुले यांनी शिक्षणा सोबत सामाजिक क्रांती केली. आज शिक्षण घेतले जाते आहे परंतु त्यातुन विवेकी समाज निर्माण होत नाही ही खंत आहे. तात्यासाहेब फुले ज्यावेळेस शिक्षणासाठी अपार मेहनत घेत असतांनाच त्यांना त्यांच्या घरातुन गोविंदराव यांचा विरोध झाला. एका कुलकर्णी नामक नोकराने गोविंदराव यांना जोतिराव यांना शाळेत टाकू नये हा सल्ला दिला. महात्मा फुलेंनी घर सोडले परंतु आपले उद्दिष्ट साध्य केले. त्यावेळी उस्मान शेख हा मुन्शी बेग यांचा संबधित मदतीला धावून आला.. स्वजातीतील कुणी पुढे आले नाही. अशा वेळी माणुसकी असलेले उस्मान शेख यांची उदारता दिसुन आली. आपले घर जोतिराव फुले यांना दिले. ह्या उस्मान शेख यांची बहिण म्हणजे फातिमा शेख..सावित्रीमाई व फातिमा यांची मैत्री जुळली. शाळा शिकून फातिमाने सावित्रीमाई बरोबर शिक्षण प्रसाराचे काम केले. तर
अशा ह्या फातिमांचा जन्म दिवस 9 जानेवारीला 1831 मध्ये झाला.
सावित्रीमाई च्या सोबत फातिमाने शिकुन फेरारी सिंथिया हया अहमदनगर येथील शिक्षकी प्रशिक्षण केंद्रात शिक्षकाचा लागणारा अभ्यासक्रम पुर्ण केला. फेरारी ह्या अमेरिकन मिशनरी होत्या परंतु त्या शिक्षण प्रसाराचे काम करायच्या..त्यांच्या 2 स्कुल होत्या एक मुंबई ला व दुसरी अहमदनगर ला होती. ह्या स्कूलमध्ये सावित्रीमाईनी व फातिमा शेख यांनी अभ्यासक्रम पुर्ण केला.फातिमा ही मुस्लिम होत्या. त्यांच्या समाजात स्त्री शिक्षण ला प्राधान्य नव्हते. फातिमा ला शिक्षण घेण्यास समाजकंटकाकडून बराच त्रास झाला परंतु त्यांना मुन्शी गफ्फार बेग यांचा मोठा पाठिंबा होता. त्या ठाम राहिल्या. त्यांनी शिक्षण घेतले. पुढे मुलींच्या शाळेत शिक्षिका मिळे ना त्यावेळेस फातिमा शेख समाजाचा विरोध झुगारुन शिक्षिका बनल्या. मुस्लिम समाजातील त्या पहिल्या शिक्षिका आहेत. तसेच भारताच्या दुसऱ्या शिक्षिका ठरल्या. सावित्रीमाई च्या सोबत खंबीर उभ्या राहिल्या. आपल्या घरात ‘स्वदेशी पुस्तकालय ‘खुले करून त्यांनी त्यांच्या समाजातील मुलींना शिकविले. घरी समाजातील मुलींना शिकवत तर सावित्रीमाई ला शाळेत शिक्षिका म्हणून मदत करीत. सावित्रीमाई यांना शाळा काढण्यास मदत करत मुंबई 2 शाळा सुरु करण्यात फातिमाचे योगदान आहे. सावित्रीमाई च्या 5 शाळेत त्यांनी अध्यापनाचे काम केले.आपला समाज मागे आहे त्याला शिक्षण प्रवाहात आणण्याचा प्रयत्न त्यांनी आरंभिला होता. सावित्रीमाई ला शेवट पर्यंत साथ देणारी सावली म्हणून हया फातिमा शेख होत्या .सावित्रीमाई 1856 मध्ये लिहिलेल्या जोतिबास पत्रात फातिमा शेख यांचा उल्लेख आढळतो. 2014 ला हरी नरके यांच्या प्रयत्नाने फातिमाचा उल्लेख बालभारतीने पुस्तकात केला. मुस्लीम समाजाला व बहुजनांना शिक्षणासाठी अहोरात्र मेहनत घेणारी फातिमा एक मोठे नाव आहे.त्यांचे देहवसान 9 आॅटोबर 1900 ला झाले.भारतातील दुसऱ्या शिक्षिका फातिमा शेख यांना विनम्र अभिवादन!!
पत्रकार
एस. एच. भवरे

