मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानांतर्गत मार्गदर्शक सूचनांचे पालन करा-गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील
![]()

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानांतर्गत मार्गदर्शक सूचनांचे पालन करा-गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील
अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर तालुक्यातील जिल्हा परिषद माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांना कळविण्यात येते की मुख्यमंत्री’ माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमाबाबत काही मार्गदर्शक सूचना देण्यात आलेले आहेत तरी त्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन अमळनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे..
दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ रोजी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मुख्यमंत्री माझी
शाळा सुंदर शाळा’ हे अभियान राज्यात राबविण्यासंदर्भात सविस्तर सूचना निर्गमित केलेल्या आहेत. याअनुषंगाने दिनांक १३ डिसेंबर २०२३ रोजी राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण निरीक्षक, मनपा प्रशासन अधिकारी व सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे सूचना निर्गमित केलेल्या आहेत. दिनांक २० डिसेंबर
२०२३ व दिनांक १ जानेवारी २०२४ रोजी शिक्षणाधिकारी स्तरावरून अभियान यशस्वी होण्याच्या अनुषंगाने सविस्तर
सूचना देण्यात आल्या आहेत.
उक्त नमूद कार्यपद्धतीचा अवलंब करुन सर्व शाळांमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान
राबविण्यास सुरुवात केलेली आहे. या अभियानास अधिक गती येण्यासाठी पुढीलप्रमाणे कार्यवाहीचे निर्देश देण्यात येत आहेत.
१. जिल्हा शिक्षणाधिकारी, प्राथमिक सर्व / माध्यमिक शिक्षण निरीक्षक सर्व प्रशासन अधिकारी (महानगरपालिका)
यांनी आपल्या जिल्ह्यातील शाळांमध्ये सुरू झालेल्या अभियानाचा सविस्तर आढावा घ्यावा. सर्व शाळांमध्ये
अभियान यशस्वी होण्यासाठी आवश्यक कार्यवाही आपल्या स्तरावरून करावी. या अभियानामध्ये सहभागी
झालेल्या शाळांची माहिती सर्व जिल्हास्तरावरील / मनपा स्तरावरील अधिकारी यांनी त्यांचे अधिनस्त पर्यवेक्षीय
यंत्रणेकडून दर आठवड्याला अचूक संकलित करावी. ती माहिती दर शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत संबंधित
विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सोबत जोडलेल्या प्रपत्रात सादर करावी. विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी नमूद केले आहे.
‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान कार्यवाही करीता ठळक मुददे-
(१) शासन निर्णय / परिपत्रके/मार्गदर्शक सूचना/ युजर मॅन्युअल सर्व क्षेत्रीय पर्यवेक्षीय व संनियंत्रण अधिकारी यांनी प्राप्त
करून घेणे व त्याचे वाचन करणे. ( शासन निर्णय / परिपत्रके, युजर मॅन्युअल इत्यादी)
(२) सर्व पर्यवेक्षीय यंत्रणेमधील केंद्रप्रमुख ते शिक्षण संचालक स्तरापर्यंतच्या सर्व अधिकाऱ्यांनी दररोज किमान दोन
शाळांना भेट देऊन अभियानाबाबत खातरजमा करण्यात यावी व अभियान यशस्वी होण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन
करावे.
(३) प्रत्येक कार्यालय प्रमुखाने आपल्या कार्यालयात या अभियानाचा ठळक फलक परिसरात लावावा.
(४) सदर अभियानास व्यापक प्रसिद्धी देणे.
(५) उपरोक्त नमूद सर्व परिपत्रके व शासन निर्णय केंद्रप्रमुख युआरसी/सीआरसी यांच्यापर्यंत पोहोचविणे
(६) अभियानाचे शासन निर्णय व सर्व परिपत्रके केंद्रप्रमुख युआरसी/सीआरसी यांच्यामार्फत प्रत्येक शाळा
मुख्याध्यापक / प्राचार्य यांच्यापर्यंत पोहोचवणे.
(७) प्रत्येक शाळेत शाळा प्रमुखांनी सर्व शिक्षक ग्रामस्थ / पालक यांना याबाबत अवगत करण्यासाठी प्रत्यक्ष बैठका घेणे.
(८) स्थानिक लोकप्रतिनिधी/माजी विदयार्थी/विविध क्षेत्रंतील कलावंत यांच्या शाळांना भेटी आयोजित करणे.
(९) शाळेमध्ये केलेल्या विविध उपक्रमांचे क्षणचित्रे / प्रतिक्रिया / मजकूर शाळा प्रणालीच्या संकेतस्थळावर अभियानात
सहभाग घेण्यासाठी कार्यवाही करावी.
(१०) शाळांनी केंद्र स्तर / तालुका स्तर, जिल्हास्तर वरील मूल्यांकन करणे (प्रत्येक स्तरावर समितीने शाळा भेट दयावी).
(११) विभाग स्तरावरील समितीने अधिनस्त शाळांचे मूल्यांकन करणे या करीता नियोजन व अंमलबजावणी करणे.
(१२) राज्य स्तरावरील समितीने अधिनस्त शाळांचे मूल्यांकन करणे.
(१३) प्रत्येक स्तरावरील समिती सदस्य सचिव यांनी पारितोषिक निवड व वितरण कार्यक्रमांचे म.न.पा. स्तर / तालुका स्तर
ते राज्य स्तर अनुषंगिक तयारी करणे.
(१४) जिल्हाधिकारी यांनी जिल्हयातील अधिकाधिक शाळांना भेट देणे व मा. मुख्यमंत्री महोदयांच्या पत्राचे वाचन करणे
यासाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी समन्वय करणे.
(१५) मा. पालकमंत्री यांनी जिल्हयातील अधिकाधिक शाळांना भेट देणे व मा. मुख्यमंत्री महोदयांच्या पत्राचे वाचन करणे
यासाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी समन्वय करणे.
(१६) या कार्यक्रमामध्ये कविता वाचन, स्वच्छतेचे महत्व, प्रत्येक शाळेत परसबाग विकसित करणे इ. बाबींवर भर दयावा.
तसेच भारताच्या उज्ज्वल भविष्यात असणा-या विदयार्थ्यांचे अनन्य साधारण महत्व व त्यांच्या योगदानाची
आवश्यकता तसेच राज्य शासनाव्दारे या अनुषंगाने जे विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत, त्या विषयी
थोडकयात विदयार्थ्यांना माहिती करुन देणे.
(१७) या उपक्रमांची जिल्हास्तरीय व विभागीय स्तरावरील स्पर्धा पूर्ण करणे.
(१८) या उपक्रमामध्ये माजी विदयार्थ्यांना सहभागी करुन घेणे.
(१९) सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यातील शाळांमध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करणे.
(२०) मा. मुख्यमंत्री महोदय यांचे संदेशपत्र प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे. सदर पत्र मुलांनी दिनांक १५/०१/२०२४ ते
दिनांक ०५/०२/२०२४ दरम्यान पालकांना वाचून दाखविणे व सदर पत्रासह पालकांसमवेत (आई वडील,
भाऊ/बहीण/आजी/आजोबा/पालक) यांच्या समवेत सेल्फी काढणे, ब्रीदवाक्य तयार करणे, थोडक्यात
शिक्षणविषयक आपले मत तयार करणे. या तिन्ही बाबी या संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी दिनांक
१५/०१/२०२४ ला देण्यात येणाऱ्या संकेतस्थळावर अपलोड करण्यास सुरुवात करणे.
(२१) अभियानाचा सांगता समारोप फेब्रुवारीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवडयात आयोजित करण्यात येणार आहे.वरील सर्व बाबींची अंमलबजावणी आपापल्या स्तरावर काटेकोर व व्यवस्थित होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत.
याबाबत कार्यवाही करताना कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी असे आवाहन (सूरज मांढरे, भा.प्र.से.)आयुक्त (शिक्षण)
महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी केले आहे.

