जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मारवड येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी
![]()
आज जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मारवड येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली . या कार्यक्रमाचे प्रसंगी शाळेचे अध्यक्ष श्री. दादासो. चंद्रशेखर साळुंखे व ताईसौ. ललिता साळुंखे ह्या उपस्थित होत्या. त्याचबरोबर सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य ताईसो. सौ.रजनी गुरव ह्या प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमास उपस्थित होत्या. याप्रसंगी इयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांचे वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. *यात एकूण 26 विद्यार्थ्यांनी सहभाग *घेतला* . यात प्रथम क्रमांक कुमारी जान्हवी हेमकांत साळुंखे .द्वितीय क्रमांक दिव्यानी समाधान शिंदे व तृतीय क्रमांक रुष्वी अरुणकुमार साळुंखे. यांनी पटकावला तसेच मंथन चंद्रकांत साळुंखे व मनस्वी किशोर साळुंखे यांनी उत्तेजनार्थ बक्षीस मिळविले* . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती स्वाती पाटील उपशिक्षिका यांनी केले. प्रास्ताविक श्री.दिनेश मोरे यांनी केले.या स्पर्धेचे परीक्षण मुख्याध्यापिका श्रीमती मनीषा निकम यांनी केले. तसेच या कार्यक्रमास सर्व शिक्षकांनी सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी राबवला. या सर्व सहभागी विद्यार्थ्यांना व निवड झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.सदर बक्षिसे ही सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य ताईसो.सौ.रजनी गुरव यांनी दिली. तसेच सन्माननीय शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. चंद्रशेखर साळुंखे यांनी सर्व मुलांना प्रत्येकी 21 रुपये व सर्व मुलींना प्रत्येकी 51 रुपयाचे बक्षीस दिले . या दोघांचे शाळेच्या वतीने आभार व ऋण व्यक्त करण्यात आले. तसेच याप्रसंगी सावित्रीबाई दत्तक पालक योजनेअंतर्गत दीक्षू किरण पवार, आस्था निंबा भामरे व प्रगती मोहन गुरव यांना प्रत्येकी 360 रुपयाचा चेक देण्यात आला.



