मुलीच्या शिक्षणाची ज्योत लावणारी ज्ञानदात्री सावित्रीमाई!!
![]()

मुलीच्या शिक्षणाची ज्योत लावणारी ज्ञानदात्री सावित्रीमाई!!
विश्वातील एकमेव जमात जी ज्ञानाचे उपयोजन करू शकते ती म्हणजे मानव जमात होय. प्रत्येक कृतीत उन्नती शोधणारी बुध्दीमान जात..अशा जातीला ज्ञानाची साथ योग्य मिळाली तर ती अगाध असे वैश्विक वर्तन करु शकते. ह्या भारताची ही जात संस्कारक्षम होती. मानवाच्या कुतुहलाच्या संकुलात नवनवीन शोधत होती. अशा जमातीला स्वार्थाने बरबटलेल्या जमातीने कपटाने राज्य मिळविले. त्यांनी स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजु लागले. त्यांनी वर्णाश्रम निर्माण करुन पोकळ श्रेष्ठतेची फुशारकी मिळविली. आपण विद्वान जमात ठरावे म्हणून इतरांना श्रेष्ठत्व नाकारण्यासाठी त्यांनी इतरांना शिक्षण नाकारले. ही मनुवादी जमात बहुजनांना भ्रमिष्ट करण्यास यशस्वी झाली. भारतात उत्तम ज्ञानाची परंपरा होती. प्रसिध्द विदयापीठे होती.कालांतराने मनुवादी वृत्तीने ह्या भारताची ज्ञानाची परंपरा मोडली. पेशवेशाहीत तर मानवतेची फार हानी झाली. पेशवेशाहीत कर्मकांडाने जागा घेऊन समाजाच्या प्रगतीला बाधा आली. ह्या काळानंतर त्याची झळ पेशवेशाहीच्या अंतापर्यंत टिकली. त्याच काळात महात्मा फुले व सावित्रीमाई ह्या जोडीने जातीयतेच्या भींती मोडण्यास सुरुवात केली. सावित्रीमाई ह्या सुरुवातीला शिक्षण न घेतलेल्या जिद्दी महिलेने शिक्षण घेऊन आपल्या धन्याबरोबर साथ देऊन समाजाच्या उन्नतीचे काम केले. अशा ह्या सावित्रीमाई चा जन्म नायगाव हया गावी 1831साली झाला. सावित्रीमाई ही मितभाषी, सामंजस, सुस्वभावी, हुशार होती. घरात वडील खंडू नेवसे पाटील हे गावाचे पाटील होते. आई लक्ष्मीबाई ही सुध्दा कष्टाळु होती. अगदी संस्कारशील गृहीणी होती. वडील सर्वांना न्याय देणारे होते. बहुजनांना शिक्षण नव्हते. त्यामुळेच सावित्रीमाई शिकू शकल्या नाही. वडील अनुभवाने संपन्न व्यक्तिमत्त्व होते. सावित्रीमाई स्वंयपाकात कुशल होत्या. आई चे सर्व गुण त्यांनी घेतले होते. सावित्रीमाई यांचे वय 9 असतांनाच त्यांचे जोतिबा फुले यांच्याशी लग्न झाले. एक उत्कृष्ट शेतकरी ,चौकस, वैज्ञानिक दृष्टी असलेल्या जोतिबाशी लग्न झाल्याने सावित्रीमाई च्या जीवनाला कलाटणी मिळाली. सावित्रीमाई यांना जोतिबांनी शिकविले. शेतातील मातीत, हातातील पाटीवर माई अक्षरे गिरवत होती. सावित्रीमाई ला शिक्षण घेण्याची इच्छा जोतीबामुळे पूर्ण झाली. सावित्रीमाई ला एका यात्रेत इंग्रज अधिकाऱ्यांकडून पुस्तक मिळाले होते. ते ही शिकल्यावर वाचता आले. जोतिबाने अहमदनगर येथील फेरारी मॅडमांच्या मदतीने शिक्षकी पेशाचा कोर्स सावित्रीमाई चा पूर्ण करुन घेतला. सावित्रीमाई हिने आपल्या धन्याच्या कृतीला प्रयत्नाची साथ दिली. पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. सावित्रीमाई ह्या त्या शाळेत पहिल्या शिक्षिका बनल्या. सावित्रीमाई ला आपले सासरे गोविंदराव फुले यांचा विरोध झाला. त्याला जबाबदार बहुजनाला शिक्षण नाकारणाऱ्या मनुवादी वृत्तीच्या व्यवस्थेमुळे होते. सावित्रीमाई ने आपले जीवन जोतिबाला समर्पण केलेले होते. सावित्रीमाई ने शिक्षण देतांना अंगावर शेण, दगडगोटे खाल्ले पण त्या मागे हटल्या नाही. सावित्रीमाई ह्या जोतिराव प्रमाणे पुरोगामी बनल्या. समाज सुधारणेचे व्रत त्यांनी घेऊन सारे जीवन त्यासाठी वेचले. जोतिबा व सावित्रीमाई ह्या एका नाण्याच्या दोन बाजुच होत्या. ते एकमेकांना समर्पित होते. सावित्रीमाई ने नाव्हीचा लोकांचा संप घडवुन ब्राम्हण ह्या उच्च जातीत होणाऱ्या विधवांच्या गुलामगीरीला वाचा फोडली. काशी नावाच्या विधवा ब्राम्हण महिलेवर अत्याचार करुन गर्भवती असलेल्या महिलेचे जीव वाचवुन तिच्या बाळाला दत्तक घेऊन आम्ही कुण्या जातीचे नाही आम्ही केवळ मानवतेचे उपासक आहोत हे सिध्द केले. जोतिराव यांचे सारे कार्य सावित्रीमाई ने पुढे चालु ठेवले. जातीयता, सावकारी पाश, महिला सतीप्रथा, जरठ विवाह, बालविवाह, निरक्षरता यावर अप्रतिम काम केले. आज जे महिला, पुरुष सुशिक्षित प्रमाण दिसत आहे. ते ह्या जोतिराव व सावित्रीमाई ची कृपा आहे.
एस. एच. भवरे-विशेष प्रतिनिधी मराठी लाईव्ह न्युज

