1 min read

२ जानेवारी २०२३ रोजीचा आझाद मैदान (मंत्रालय) मुंबई वरील भव्य राज्यव्यापी मोर्चा यशस्वी करा-रामकृष्ण पाटील

Loading

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना

दि.०२ जानेवारी २०२३ रोजीचा आझाद मैदान (मंत्रालय) मुंबई वरील भव्य राज्यव्यापी मोर्चा यशस्वी करा.

अंगणवाडी कर्मचारी भगिनिनों,
राज्यातील दोन लाख अंगणवाडी कर्मचारी ७ डिसेंबर २०२३ पासून बेमुदत संपावर गेल्या आहेत.हिवाळी अधिवेशनात आणि आजही राज्यभर अंगणवाडी कर्मचारी विविध आंदोलने करित शासनाचे लक्ष वेधत आहेत.
परंतु सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यां सोडविण्यासाठी शासनाने आजपर्यंत कोणतीही दखल घेतलेली नाही.परिणामी राज्यातील सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड राग व चिड निर्माण झाली असून नाराजी पसरली आहे.
शासनाने संप चिरडण्यासाठी अंगणवाडी केंद्राचा ताबा ग्रामपंचायतीकडे देण्याबाबत आदेशित करत प्रचंड दबाव आणला.
परंतु अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दबावाला बळी न पडता आपला संप सुरुच ठेवण्याचा पक्का निर्धार केल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या एकीच्या ताकदीमुळे शासन आणि प्रशासन पूर्णतः हतबल झाले आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे काम आठ तास ग्राह्य धरून त्यांना वेतन श्रेणी लागू करण्यात यावी, सेवा निवृत्तीनंतर दरमहा पेंशन देण्यात यावे,मा.सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ग्रॅच्युईटीचे नियम तयार करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावे,योजनेच्या कामकाजासाठी नवीन आणि अद्यावत जास्त क्षमता असलेले मोबाईल फोन पुरविण्यात यावेत.
याप्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी *दिनांक ०२जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता आझाद मैदान मुंबई (मंत्रालयावर) येथे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा *श्री.अरुण गाढे(नागपूर), मायाताई परमेश्वर(मुंबई), संजय मापले(अमरावती)* यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.
तरी जिल्हयातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांनी गणवेश परिधान करून शंभर टक्के भागीदारी करून भव्य मोर्चा यशस्वी करावा असे आवाहन संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *