चामुंडा माता बहुउद्देशिय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे सत्कार समारंभ
![]()



अमळनेर प्रतिनिधी-आज दि.२७/१२/२०२३ वार-बुधवार रोजी आपल्या चामुंडा माता बहुउद्देशिय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे श्री. सुनिल पवार साहेब (पोलीस निरीक्षक, पारोळा पो. स्टेशन ),सौ. भारती पवार मॅडम, ताईसाहेब श्रीमती.दर्शना पवार मॅडम(समाजसेविका, अमळनेर), श्री. दिनेश बागडे(खेलो इंडिया पॅरा पॉवर लिफ्टिंग-२०२३,कांस्यपदक विजेते),श्री. किशोर महाजन(प्रशिक्षक, संचालक-मसल फॅक्टरी, अमळनेर) आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी श्री. दिनेश बागडे(खेलो इंडिया पॅरा पॉवर लिफ्टिंग-२०२३,कांस्यपदक विजेते),यांचा सत्कार श्री. सुनिल पवार साहेब (पोलीस निरीक्षक, पारोळा पो. स्टेशन यांनी व संस्थेचे अध्यक्ष आण्णासो. डॉ.योगेश रघुनाथ महाजन सर यांचे हस्ते करण्यात आला.तसेच डॉ योगेश रघुनाथ महाजन सर यांनी सर्व मान्यवरांचा स्वागत व सत्कार केला. त्यानंतर शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी आलेल्या सर्व मान्यवरांच औक्षण केलं.त्यादरम्यान शाळेचे मुख्याध्यापक श्री. मनिष जाधव सर यांनी मेरे सरकार आये है.हे छान गीत गाऊन कार्यक्रमाचा उत्साह वाढवला. त्यानंतर श्री. मनिष जाधव सर यांनी शाळेची माहिती दिली.त्यानंतर दिव्यांग मुलांच्या पालकांची असंवेदनशीलता यावर दिव्यांग विद्यार्थी समवेत विशेष शिक्षकांनी सुंदर अशी नाटिका सादर केली. शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी छान-छान नृत्य सादर केली. तसेच शाळेतील दिव्यांग विद्यार्थी प्रधान बारेला याने गीत गाऊन दाखवलं तसेच अजय परदेशी या विद्यार्थ्यांने सिने कलाकारांची मिमिक्री करुन दाखवली.श्री. जगदीश सोनवणे सर यांनी दिशा अभ्यासक्रमाविषयी माहिती दिली तसेच श्री. हेमंत महाजन सर यांनी मतिमंद मुलांच्या गरजा व भावनांविषयी माहिती दिली.त्यावेळी ताईसाहेब श्रीमती. दर्शना पवार मॅडमांनी संस्थेचे अध्यक्ष डॉ योगेश महाजन सर आणि सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कामांच कौतुक केलं. तर अध्यक्षीय भाषणांत श्री. सुनिल पवार साहेबांनी साहेबांनी सुद्धा अध्यक्षाचं आणि सर्व कर्मचाऱ्यांचं कौतुक करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जगदीश सोनवणे सर यांनी केले .तर आभारप्रदर्शन श्री.प्रताप पाटील सर यांनी केले.

