मंगळ ग्रह सेवा संस्थेला आंतरराष्ट्रीय सेवाकार्याचा सर्वोच्च पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार…
![]()

मंगळ ग्रह सेवा संस्थेला आंतरराष्ट्रीय सेवाकार्याचा सर्वोच्च पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार…
अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिर हे देशात दोनच आहेत त्यापैकी अमळनेर येथील मंगळ ग्रह आहे. येथील अध्यक्ष व विश्वस्त मंडळांनी आजतागायत अनेक उपक्रम राबवले आहेत. मंदीराचा आजूबाजूचा परीसर धार्मिक झाला आहे.
राज्यातील व राज्याबाहेरील अनेक पर्यटक व भाविक मोठ्या संख्येने मंगळ ग्रह सेवा संस्थांना भेट देतात.
मंगळ ग्रह सेवा संस्थेच्या उत्कृष्ट कार्यामुळे नुकताच थायलंडची राजधानी बँकॉक येथे सेवा कार्याचा सर्वोच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल मंगळ ग्रह संस्थांनचे अध्यक्ष डिगंबर महाले सर यांचा सत्कार नुकताच महाराष्ट्र मराठी पत्रकार संघ अमळनेरच्या वतीने शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शरद कुलकर्णी, तालुकाध्यक्ष जयवंतराव वानखेडे ,जेष्ठ पत्रकार उमेश धनराळे, उमेश काटे, ईश्वर महाजन, राहुल पाटील ,समाधान मैराळे,बापूराव ठाकरे, मधु विसावे, उमाकांत ठाकूर,कमलेश वानखेडे सह पत्रकार उपस्थित होते…


