1 min read

माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समिती जळगाव जिल्हा शिक्षक शिक्षकेत यांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत होण्या साठी करणार उपोषण

Loading

माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समिती जळगाव जिल्हा शिक्षक शिक्षकेत यांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत होण्या साठी करणार उपोषण

माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब, मा.शिक्षणाधिकारी व म. अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक जळगाव यांना दिले निवेदन

जळगांव प्रतिनिधी-दि.26 शासन निर्णय दिनांक 19/12/2023 या शासन परिपत्रकानुसार जिल्ह्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना त्यांचे वेतन बँक खाते त्यांच्या इच्छेनुसार राष्ट्रीयकृत बँकेत किंवा कोर बँकिंग असलेल्या अन्य बँकेत उघडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.तरी आपण त्या संदर्भात तात्काळ आदेश व्हावेत अन्यथा सर्व संघटना 1 जानेवारी 2024 पासून जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे (स्टेट गव्हर्मेंट सॅलरी पॅकेज) SGSP अंतर्गत राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडे पावतो मा.जिल्हाधिकारी साहेब जळगाव यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करतील अशा आशयाचे निवेदन आज दिनांक 26/12/2023 रोजी माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब तसेच शिक्षणाधिकारी कार्यालय व अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक जळगाव या कार्यालयाला माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समितीचे श्री नारायण आनंदा वाघ जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती जळगाव, डॉ.मिलिंद बागुल व तुळशीराम सोनवणे समन्वयक माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समिती जळगाव जिल्हा, श्री गोविंदा पाटील जिल्हाध्यक्ष शिक्षक सेना जळगाव, श्री प्रभाकर बोरसे जिल्हाध्यक्ष भा.ज.पा.शिक्षक आघाडी जळगाव, गिरीश नेमाडे जिल्हाध्यक्ष शिक्षक परिषद जळगाव, किशोर घुले प्रहार संघटना जळगाव, श्री संतोष कचरे, एस एस जंगले, एल जे भूगवड्या, एस के राणे राजपूत व कृष्णराव विसावे सर यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *