1 min read

शिरपूर शिंपी समाज वसतिगृह व मंगल कार्यालय लोकार्पण सोहळा संपन्न
परिवर्धे येथील रतिलाल शिंपी यांचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शिलाई मशिन वाटप.

Loading

शिरपूर शिंपी समाज वसतिगृह व मंगल कार्यालय लोकार्पण सोहळा संपन्न
परिवर्धे येथील रतिलाल शिंपी यांचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शिलाई मशिन वाटप.
मनिलाल शिंपी यांच्याकडून खऱ्या अर्थाने पितृसेवा,आणि मानवसेवा समजली:: वनेश खैरनार
शिरपूर. ( प्रतिनिधी)- शिरपूर येथील अंबिकानगर येथे श्री. क्षत्रिय अहिर शिंपी शिक्षण प्रसारक मंडळ, शिरपूर संचालित कै. सुभाषचंद्र जानकीराम बाविस्कर (शिंपी) वसतिगृह व समाज मंगल कार्यालयाचा लोकार्पण सोहळा काल संपन्न झाला.
याप्रसंगी कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शिरपूर तालुक्याचे आमदार दादासो. काशीराम वेचान पावरा,धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष देवेंद्र पाटील, अखिल भारतीय श्री. क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष वनेश शंकरराव खैरनार,तसेच धुळे व जळगाव समाज बांधव मोठ्या संख्येने शिरपूर शिंपी समाज अध्यक्ष नितीन सुभाष बाविस्कर, शिरपूर येथील शिंपी समाजाचे उपाध्यक्ष चंद्रशेखर रामेश्वर बिरारी, शिंपी समाज शिरपूर सचिव दिलीप धोंडू सावळे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिंपी समाज वसतिगृह व समाज मंगल कार्यालयाचे अनावरण सोहळा संपन्न झाला. शिरपूर तालुक्याचे आमदार मा. श्री.काशीराम दादा पावरा यांनी संत नामदेव यांच्या प्रतिमेचे पूजन करत त्यांच्या कार्याची महती स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्री. ललित खैरनार व श्री. राजेंद्र शिंपी सर यांनी केले. या प्रसंगी शिरपूर तालुक्यातील सर्व शिंपी समाज बांधव उपस्थित होते.शिंपी समाज कार्यालय शिरपूर येथे २००२ मध्ये बांधले गेले.२०२३ त्याचे संपूर्ण बांधकाम पूर्णत्वास आले. सर्व शिंपी समाज बांधव यांनी जमलेल्या गंगाजळीतून व देणगीतून समाज कार्यालय हे पूर्णतास आणले आहे. तसेच विद्यमान अध्यक्ष श्री. नितीन सुभाष बाविस्कर यांनी रक्कम पाच लाख एक्कावण हजार रुपये देणगी देऊन मोठा हातभार शिंपी समाज मंगल कार्यालय बांधकामास लावला आहे. समाजातील इतर बरेच मान्यवरांनी मोठा आर्थिक हातभार लावला आहे. याप्रसंगी समाजातील तीन शिरपूर येथील समाज मंगलकार्यालय लोकार्पण सोहळा प्रसंगी, शिरपूर तालुका (शहराचे) आमदार श्री.काशिराम पावरा, धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवेंद्र पाटील, अखिल भारतीय क्षत्रिय शिंपी समाजाचे अध्यक्ष श्री.वनेशजी खैरनार यांचा उपस्थितीत,मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख आर एस पी अधिकारी युनिट कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांच्यातर्फे त्यांचे पिताश्री श्री. रतिलाल रामदास शिंपी यांचा जन्म अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ३ गरजू समाज बांधवांना शिलाई मशीन चे वाटप करण्यात आले. अश्या प्रकारे वडिलांचा अमृतमहोत्सव निमित्त शिलाई वाटप करून समाजात आदर्श घालून दिला.आजपासुन शिंपी समाज वसतिगृह व मंगल कार्यालय विविध कार्यक्रमासाठी उपयोगात येणार आहे.
या शिंपी समाज वसतिगृहाच्या व समाज मंगल कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्याच्या यशस्वीतेसासाठी सर्व आजी माजी अध्यक्ष व सचिव, संजय खैरनार, दिनेश सोनवणे, अशोक देवरे, हेमंत बाविस्कर,सागर निकुंभ मनोज बिरारी व सर्व समाजबांधवांचे अनमोल सहकार्य लाभले आहे.यावेळी परिवर्धे येथील डॉ.किशोर आमोदकर ,कल्याण शिंपी समाजाचे उपाध्यक्ष अरविंद शिंपी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *