बळीराजा यास जायन्ट्स गृप तर्फे अनोखी मानवंदना.
![]()

बळीराजा यास जायन्ट्स गृप तर्फे अनोखी मानवंदना.
आज दि.२३/१२/२०२३ वार.शनिवार रोजी अमळनेर शहरात तळागाळातील सर्वसामान्य व्यक्ती यांनी एकत्र येवून 5 नोव्हेंबर 23 रोजी जायन्ट्स गृप स्थापीत केला आहे.गृपच मुळ उद्देश गरजूंना मदत व मार्गदर्शन करुन सदैव मैत्रीचा हात म्हणून अमळनेर शहरात प्रथमच राष्ट्रीय किसान दिवसाचे औचित्य साधून आणि बळीराजा चा सन्मान म्हणून त्याच्या श्रमाचे मोल जाणून त्याने पीकवीलेले धान्य व धान्यापासून तयार केलेले अन्न किंवा खाद्य पदार्थ बनविल्या नंतर त्याचा अपव्यय टाळण्यासाठी आमळनेर शहरात जागरुकता मोहीम जायन्ट्स गृप व परिवाराने हाती घेतली आहे.सदर मोहीमेत अन्नाचा अपव्यय टाळता यावा यासाठी अमळनेर शहरातील जवळ जवळ सर्व मंगल कार्यालयात बॅनर लावण्यात येणार आहेत.
सदर बँनर मंगलकार्यालयाच्या दर्शनी भागात लावून जनजागृती करावयाच्या हेतूने असतील आज या कार्याला मुहुर्तप्रतिनिधिक सुरुवात मंगळ ग्रह मंदिर भोजनालय पासून केली आहे.
सदर बँनर 19 मंगलकार्यलयामध्ये लावण्यात येणार आहे.
सदर फलक अनावरण प्रसंगी जायन्ट्स अध्यक्ष सुनील पंडितराव पाटील आणि सदस्य डॉ महेश पाटील, संदीप महाजन , भ टू पाटील , राजेन्द्र भावसार ,महेश पाटील, संतोष वाघ , मंगळग्रह जनसंपर्क अधिकारी श्री शरद कुलकर्णी हे सुध्दा उपस्थित होते ,, उपाध्यक्ष रमेश महाजन ,अश्विन पाटील सेक्रेटरी प्रशांत भटू पाटील हे ही उपस्थित होते ,,
लग्नकार्यात अन्नाची होणारी नासाडी थाबवावी या विषयावर हे प्रबोधन फलक आहेत ,

