1 min read

जि.प.उच्च प्राथ.शाळा पिंगळवाडे
शाळेतील स्काऊट विद्यार्थ्यी जिल्हास्तरीय मेळाव्यात सन्मानित

Loading

जि.प.उच्च प्राथ.शाळा पिंगळवाडे
शाळेतील स्काऊट विद्यार्थ्यी जिल्हास्तरीय मेळाव्यात सन्मानित

अमळनेर प्रतिनिधी-
जि.प.जळगाव चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.अंकीत साहेब व प्राथ.शिक्षणाधिकारी तथा जिल्हा मुख्य आयुक्त (स्काऊट) मा.श्री.विकास पाटील साहेब यांचे प्रेरणेने तसेच मा.श्री.बी.व्ही.पवार साहेब (जिल्हा प्रशिक्षण आयुक्त) यांचे मार्गदर्शन व अथक प्रयत्नातून जि.प.जळगावच्या इतिहासात प्रथमच कब-बुलबुल जिल्हास्तर मेळाव्याचे आयोजन दि.23 व 24 डिसें.2023 रोजी एल.एच.पाटील इंग्लिश मेडीयम स्कूल वावडदा ता.जळगाव येथे करण्यात आले होते.
सदर जिल्हास्तरीय कब-बुलबुल मेळाव्यात आमच्या जि.प.उच्च प्राथ.शाळा पिंगळवाडे शाळेतील स्वामी विवेकानंद कब पथकास मोगली कथा सादरीकरण (सामुहिक) स्पर्धेत प्रथम क्रमांक व चेंडू बादलीत टाकणे (वैयक्तिक) स्पर्धेत चि.गिरीश किशोर चव्हाण (इ.2 री) यास उत्तेजनार्थ तसेच क्राफ्ट कागद काम (वैयक्तिक) स्पर्धेत चि.हर्ष समाधान पाटील (इ.3 री) यास उत्तेजनार्थ असे एकूण 1 सांघिक व 2 वैयक्तिक पारितोषिक मिळाल्याबद्दल संपूर्ण कब पथकाचे मन:पूर्वक अभिनंदन! करण्यात आले असे स्काऊट शिक्षक व आदर्श शिक्षक दत्तात्रय सोनवणे यांनी सांगितले.
शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, शालेय समितीचे चेअरमन, सदस्य यांनी अभिनंदन केले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *