शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिका-यांच्या जळगाव लोकसभा मतदारसंघ विविध तालुका भेटी
![]()


जळगाव लोकसभा मतदारसंघ विविध तालुका भेटी
दिनांक २४ डिसेंबर रविवारी रोजी शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी विविध ठिकाणी व्दारदर्शन सांत्वन, विवाह भेटी, कार्यक्रम, सदिच्छा भेटी दिल्या याप्रसंगी युवासेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी,संतोष सोनवणे तालुका समन्वयक शिवसेना,आर.एल.नाना, महेंद्र पाटील,खलाणे नाना, रमेश आबा चव्हाण, नानाभाऊ कुमावत, शैलेंद्र सातपुते, महेन्द्र जयस्वाल चाळीसगाव, योगेश चौधरी, अनिल कोळी, विनायक भाऊ, संदीप धनगर म्हसावद,संजूभाऊ कोळी, डॉ.कदम, मिलिंद नारखेडे, सचिन चौधरी आसोदा,छगन खडसे,अरुन कोळी भादली, भाऊसाहेब सोनवणे,राजूभाऊ पाटील,उमेश पाटील, नाना पाटील शिरसोली,गोपाल माळी सर, रमेश पांडे, मनोज पांडे, गजानन महाजन इत्यादी उपस्थित होते.
🔸आडगाव ता.एरंडोल येथे सकाळी १० वा . एकनिष्ठ शिवसैनिक धनराज भाऊ हे ग्रामपंचायत मध्ये पोटनिवडणुकीत निवडून आले म्हणून त्यांचा सत्कार केला.
🔸चाळीसगाव येथे स्व.तुकाराम मामा कोळी यांच्या शोकसभेत ११:३०वा उपस्थिती दिली.
🔸पाचोरा येथे वैशाली ताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
🔸म्हसावद ता.जळगांव ग्रामीण येथे पदाधिकारी सदिच्छा भेट घेतली.
🔸बोरनार (म्हसावद)येथे व्दारदर्शन सांत्वन केले.
🔸रामदेववाडी ता . जळगाव ग्रामीण येथे व्दारदर्शन केले.
🔸 शिरसोली ता जळगांव ग्रामीण येथे दोन ठिकाणी द्वारदर्शन सांत्वन भेट.
🔸जळगाव येथील हाॅस्पिटल मध्ये जाऊन आसोदा येथिल शिवसेना विभागप्रमुख संजूभाऊ कोळी यांच्या भावाच्या तब्येतीची विचारपूस केली.
🔸आसोदा ता जळगांव ग्रामीण येथे दोन ठिकाणी व्दारदर्शन सांत्वन केले.
🔸भादली ता.जळगाव येथे दोन ठिकाणी व्दारदर्शन सांत्वन भेट.
🔸कठोरा ता.जळगांव येथे संरपच समाधान पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट
🔸भोकर ता.जळगाव येथे दिलीप बाविस्कर यांच्या मुलांचा हळद कार्यक्रम उपस्थिती.
🔸निंभोरा येथे सप्ताहाच्या पालखी कार्यक्रमात रात्री ७:३०वा उपस्थिती दिली.
🔸चिंचपुरा ता धरणगाव येथे ८ वा. हळद कार्यक्रम उपस्थिती.
🔸पिप्री ता धरणगाव येथे तुकाराम पाटील यांच्या दोन मुलांच्या हळद कार्यक्रम उपस्थिती.
🔸धरणगाव येथील वाढदिवसाच्या कार्यक्रमात ८:३० वा . उपस्थिती दिली.
मिडिया प्रमुख
गजानन महाजन
विलास पवार.

