1 min read

मनाची आणि संस्काराची दृढता सानेगुरुजींच्या जीवनातून लक्षात येते.
सचिन जंगले

Loading

मनाची आणि संस्काराची दृढता सानेगुरुजींच्या जीवनातून लक्षात येते.
सचिन जंगले
असोदा – साने गुरुजींच्या जीवनात विद्यार्थ्यांचे महत्त्व अनन्यसाधारण असे होते आणि देश घडविण्यासाठी विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांनी आपली कर्तव्य प्रामाणिकता महत्त्वाची मानत मूल्यांची रुजवात करण्यासाठी मनाची आणि संस्काराची दृढता कायम अंगीकारली असे मत सार्वजनिक विद्यालयात साने गुरुजी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलताना सचिन जंगले यांनी व्यक्त केले.याप्रसंगी मंचावर उपस्थित मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल,पर्यवेक्षक एल. जे. पाटील,ज्येष्ठ शिक्षक डी. जी. महाजन,मंगला नारखेडे, के.बी.तायडे यांच्या हस्ते साने गुरुजींच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.याप्रसंगी हर्षल कोळी,सिद्धार्थ कापडणे,सृष्टी डोळसे,मोहिनी पाटील,यज्ञिका पाटील,चिन्मय भोळे, ईशा पाटील,यामिनी भारुळे या विद्यार्थ्यांनी साने गुरुजींच्या जीवनातील प्रसंग व माहिती सांगितली.कोमल कासार या विद्यार्थिनीने साने गुरुजींचे गीत सादर केले.मुख्याध्यापक डॉ मिलिंद बागुल आपल्या मनोगतात बोलतांना म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या मनात आपल्या आचरणातून आणि निष्ठा पूर्वक अशा कर्तव्यातून साने गुरुजींनी स्थान मिळवलेले होते स्वातंत्र्यलढ्यातला त्यांचा सहभाग आणि खानदेश परिसरामध्ये त्यांनी केलेले कार्य आजही सर्वश्रुत असल्याचे मत त्यांनी याप्रसंगी मांडले. पर्यवेक्षक एल .जे.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक भावना चौधरी, सूत्रसंचालन प्रज्ञा कापडणे या विद्यार्थिनीने तर आभार देवयानी माळी या विद्यार्थिनीने मानले. कार्यक्रमात सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *