1 min read

गणितीय कृती आणि शैक्षणिक साहित्य प्रदर्शनातून गणिताची भीती घालविता येणे सहज शक्य.–डॉ.जे.एन.चौधरी.

Loading

गणितीय कृती आणि शैक्षणिक साहित्य प्रदर्शनातून गणिताची भीती घालविता येणे सहज शक्य.–डॉ.जे.एन.चौधरी.

जळगाव:येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात २२डिसेंबर राष्ट्रीय गणित दिनाचे औचित्य साधून ‘गणितोत्सव’ ह्या आगळावेगळ्या बौद्धिक उत्सवाद्वारे थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा उपप्राचार्या श्रीमती करुणा सपकाळे यांच्या हस्ते प्रमुख वक्ते मू.जे.(स्वायत्त) महाविद्यालयाच्या गणित विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ.जे.एन. चौधरी यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमप्रसंगी पर्यवेक्षक प्रा.श्री.आर.बी.ठाकरे, प्रदर्शनाचे परीक्षक डॉ. कुणाल इंगळे, कला व वाणिज्य शाखा समन्वयक प्रा.उमेश पाटील उपस्थित होते.या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या बौद्धिक संकल्पनेतून साकारलेल्या गणितीय कृती, गणितीय शैक्षणिक साहित्य यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी नानाविध गणितीय मॉडेल आणि पोस्टरचे सादरीकरण केले. प्रमुख वक्ते डॉ.जे.एन.चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन करताना १६व्या व १७व्या शतकापासून अद्यापही अनुत्तरित असलेल्या काही गणितीय प्रश्नांबाबत अवगत केले. त्या प्रश्नांची उकल करावयाची असल्यास विद्यार्थ्यांनी त्यांची संशोधक वृत्ती कशी वृद्धिंगत करावी याविषयी सखोल मार्गदर्शन केले. ते पुढे असेही म्हटले की, अशा गणितीय प्रदर्शनातून विद्यार्थ्यांची गणित विषयाची अनामिक भीती दूर होण्यास नक्कीच मदत होईल. सदर प्रदर्शनात एकूण २१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यात पहिल्या तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. सिद्धार्थ नन्नावरे व चिन्मयी भारंबे या स्पर्धक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणित विषय इन्चार्ज प्रा.छाया चौधरी, सूत्रसंचालन प्रा.ज्योती सोनवणे, आभार प्रदर्शन प्रा.छाया पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणित विभागाच्या सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *