1 min read

खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर
कर्मचाऱ्यांचे वेतन होणार राष्टीयकृत बँकेत ……

Loading

खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर
कर्मचाऱ्यांचे वेतन होणार राष्टीयकृत बँकेत ……

शिक्षक संघटनांच्या पाठपुराव्याला यश

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
शासकीय/निमशासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतन बँक खात्याशी संलग्न अशा अपघात विमा
विषयक लाभ आधारीत योजना विविध बँकाकडून राबविण्यात येत आहेत. वेतन खात्याशी संलग्न असणाऱ्या
अपघात विमा विषयक विविध योजना अंतर्गत अधिकारी / कर्मचारी यांच्या वैयक्तिक फायद्याच्या आहेत.
त्याकरीता बँकाकडून कोणतेही वेगळे शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे काही राष्ट्रीयकृत बँकाकडून प्राप्त
State Government Salary Package (SGSP) अंतर्गत विमा योजनांचा लाभ मिळण्यासंदर्भात
अधिकारी / कर्मचारी यांना वित्त विभागाने शासन परिपत्रक दिनांक ८/१०/२०२० अन्वये अवगत केलेले आहे.
तसेच बृहन्मुंबईतील खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्यांचे प्रदानाबाबत मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे रिट याचिका क्र.२०३९/२०१७ व रिट याचिका क्र. १७५/२०१८ झाल्या होत्या. सदर याचिकांमध्ये दि. ९.२.२०१८ रोजीच्या
आदेशान्वये शाळा व शाळामधील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांना त्यांचे वैयक्तिक खाते अन्य बँकेत
उघडण्याचे स्वातंत्र्य राहील, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. पण याबाबत सर्व संघटना मात्र चूप आहेत त्याबाबत
पाठपुरावा करावा…व
कर्मचाऱ्याचे पगार जेडीसी बँकेत
होत असल्यामुळे कर्मचाऱ्यांना कोणत्याच प्रकारचे लाभ मिळत नाही.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे पगार राष्ट्रीयीकृत बँकात करण्याबाबत प्रयत्न करावेत अशी माफक अपेक्षा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
उपरोक्त बाब मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक
विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अवगत करण्याची बाब विचाराधीन होती.शासन परिपत्रक –
वित विभागाच्या दिनांक ८/१०/२०२० च्या परिपत्रकान्वये राष्ट्रीयकृत बँकाकडून प्राप्त State Government Salary Package (SGSP) अंतर्गत अपघात विमा योजनेच्या विविध लाभाबाबत माहिती दिलेली आहे. सदर माहिती खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणण्यात येत आहे. तसेच मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या दि.
९.२.२०१८ रोजीच्या आदेशानुसार मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व
अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन बँक खाते त्यांच्या इच्छेनुसार राष्ट्रीयकृत
बँकेत किंवा कोअर बँकिंग असलेल्या अन्य बँकेत उघडण्याचे स्वातंत्र्य राहील.असे असतांना राष्ट्रीय बँकेत कर्मचाऱ्यांचे पगार झाले तर त्या कर्मचाऱ्यांना फायदे मिळतील. व इतर बँकेत कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसल्याने कर्मचारी नाराज आहेत.

चौकट

शिक्षक भारती संघटनेच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत होण्यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालय उपसंचालक कार्यालय संचलनालय आयुक्तालय असा प्रवास करत मंत्रालयापर्यंत प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता. माननीय आमदार कपिल पाटील यांच्या लक्षवेधीनंतर 19 डिसेंबर 2023 रोजीचा राष्ट्रीयकृत बँकांमधून पगार होण्याच्या संदर्भात शासनाने जीआर काढला राष्ट्रीयकृत बँकेत सॅलरी अकाउंट असल्यामुळे कर्मचाऱ्यांना 35 ते 40 लाखापर्यंतच्या विमा बँक पुरवते पर्सनल लोन चेकबुकचे व्यवस्था एटीएम व्यवस्था होम लोन मध्ये सूट असे अनेक प्रकारच्या सुविधा राष्ट्रीयकृत बँक देतात या निर्णयामुळे जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना फायदा होणार. राष्ट्रीयकृत बँकेमधून पगार होण्याच्या निर्णयाचा शिक्षक भारती संघटना स्वागत करते. शिक्षणाधिकारी कार्यालय व वेतन पथक यांनी तात्काळ राष्ट्रीयकृत बँकेत अकाउंट काढण्यासंदर्भात आदेश निर्गमित करावेत ही माफक अपेक्षा
नारायण आनंदा वाघ
जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती जळगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *