जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ विद्या समिती स्पर्धा अंतर्गत तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेचे विद्यालयात आयोजन
![]()

जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ विद्या समिती स्पर्धा अंतर्गत तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेचे विद्यालयात आयोजन
अमळनेर प्रतिनिधी
जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ विद्या समिती स्पर्धा अंतर्गत तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेचे विद्यालयात आयोजन करण्यात आले होते.. यात लहान गटात इयत्ता पाचवी ते सातवी यात विषय होता “जीवनदायी आई” यात प्रथम क्रमांक कु. प्रेरणा गिरीश बागुल के. पी.सोनार माध्यमिक विद्यालय जैतपीर व द्वितीय क्रमांक कु वर्षा हिरामण पाटील के. पी. सोनार माध्यमिक विद्यालय जैतपीर आणि.. मोठ्या गटात इयत्ता आठवी ते दहावी विषय होता “व्यसनमुक्त भारत ” यात प्रथम क्रमांक कु. गायत्री दिपक पाटील स्व. आबासाहेब अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालय मंगरूळ द्वितीय क्रमांक कु. अश्विनी मनोहर पाटील साने गुरुजी कन्या विद्यालय अमळनेर व तसेच तृतीय क्रमांक कु. नेहा दिपक पाटील स्व. अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालय मंगरूळ वरील सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एम ए पाटील तांबेपुरा होते.मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष तथा प्राचार्य श्री प्रकाश भिका पाटील, श्री राजेंद्र देशमुख सर.सौं पल्लवी पाटील जैतपीर . श्रीम शितल चव्हाण. श्रीम सीमा मोरे. राजेंद्र पाटील होते.
यात परीक्षक म्हणून प्रभुदास नथू पाटील व श्रीमती सुषमा शिवदास सोनवणे, अमोल पाटील यांनी यांनी पाहिले व कार्यक्रमाचे स्वरूप माहिती मार्गदर्शन व सूत्रसंचालन श्री संजय कृष्णा पाटील यांनी केले वरील सर्व मान्यवरांचा मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन आभार आभार व्यक्त करण्यात आले.


