उदया पासून महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी संपात उतरणार…
![]()
उदया पासून महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी संपात उतरणार…
जुनी पेन्शन व इतर मागण्यांसाठी
महाराष्ट्र राज्य शासकीय, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने घेतला निर्णय..

अमळनेर प्रतिनिधी
दि.१४ डिसें. २०२३ पासून बेमुदत संप पुकारला आहे. महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ या संपात सहभागी आहे.
महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) राज्यातील सर्व शिक्षकांना आवाहन करते की, दि.१४ डिसेंबर २०२३ पासून सुरू होणाऱ्या बेमुदत संपात सहभागी होऊन संप यशस्वी करावा.
संपाबाबत महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाचे आदेश प्रमाण मानावेत.
मा. आ. नानासाहेब बोरस्ते (अध्यक्ष)
जी.के.थोरात (कार्याध्यक्ष),हनुमंतराव भोसले (उपाध्यक्ष),हिरालाल पगडाल (महासचिव),भारत घुले (सह सचिव),डॉ.एन. डी. नांद्रे (सहसचिव) संदीप घोरपडे (खजिनदार )यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

